काम करत राहिल्याने एक वेळ संधी नक्की मिळते : आमदार निलेश लंके राष्ट्रवादीचे रवींद्र गायखे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा वाढदिवसा...
काम करत राहिल्याने एक वेळ संधी नक्की मिळते : आमदार निलेश लंके
राष्ट्रवादीचे रवींद्र गायखे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला दिला फाटा
पारनेर प्रतिनिधी :
संपूर्ण तालुक्यात आमदार निलेश लंके यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असलेले व पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सावरगाव ग्रामपंचायत सदस्य रविंद्र गायखे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून सावरगाव येथे मित्र परिवाराच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते आमदार निलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
रवींद्र गायखे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने रवींद्र गायखे यांनी साजरा केला. कार्यक्रमानिमित्त उपस्थित आमदार निलेश लंके म्हणाले की काम करत रहा काम केल्याने संधी नक्की मिळते. रवींद्र गायखे सारखा माझा सहकारी समाजामध्ये राहून काम करत आहे. अशा या सहकार्याला भविष्य चांगले असल्याचे आमदार लंके यावेळी म्हणाले.
यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी म्हणाले की रविंद्र गायखे सारखा युवक खऱ्या अर्थाने आमदार निलेश लंके यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कोरोना काळात आमदार लंके साहेब यांच्या सोबत रविंद्र हा काम करत होता. अनेक गोरगरीब जनतेला आधार देण्याचे काम रविंद्रने या काळात केले.
पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रवींद्र गायके यांनी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यांनी सावरगाव येथील मानेवाडी, चिकणेवाडी, लांडगेवाडी, काळेवाडी तसेच इतर ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्कूल बॅग यांचे वाटप केले तसेच गावातील गोरगरीब जनतेसाठी किराणा किट त्यांनी दिले.
वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून रवींद्र गायके यांनी आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला त्यामुळे परिसरामध्ये त्यांचे कौतुक होत आहे गायखे यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कोर्टन खंडोबा देवस्थानचे विश्वस्त गंगाराम बेलकर म्हसोबा झाप सरपंच प्रकाश गाजरे,
गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे पाटील ज्येष्ठ नेते भागुजी दादा झावरे पाटील, निलेश लंके प्रतिष्ठानचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी सर पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अंकुश पायमोडे पेनदरा सरपंच रंगनाथ बेलकर युवा नेते सचिन गोडसे, टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडूंगे, कातळवेढा सरपंच पियुष गाजरे, शुभम गोडसे, नवनाथ राळे, गणेश गायखे, पर्वती चिकणे, सावरगाव सेवा सोसायटीचे चेअरमन साहेबराव चिकणे, व्हा चेअरमन लहू गायके, गणेश भोसले, सावरगावचे उपसरपंच प्रदीप गुगळे, अजित भाईक, सुनील बेलकर ज्येष्ठ नेते सावरगाव ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ थोरात,
हरिभाऊ साळवे, बाळासाहेब शिरतार, बाबू गायखे, संतोष बेलकर, मुकुंद कळमकर, गोडसे, बाबाजी लांडगे, रणधीर शिंदे, गंगाराम चिकणे, भरत जगदाळे, बाळासाहेब दाते, संतोष गायखे, श्रीधर कळमकर, रामदास साळवे, बाबू साळवे, भाऊ गोडसे आदी मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच सावरगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS