लोकशाहीर अण्णाभाऊंचे साहित्य तळागाळात पोहोचवा : अमोल साळवे धोत्रे येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी पारनेर प्रतिनिधी : थोर समाज सुधा...
लोकशाहीर अण्णाभाऊंचे साहित्य तळागाळात पोहोचवा : अमोल साळवे
धोत्रे येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी
पारनेर प्रतिनिधी :
थोर समाज सुधारक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती शिक्षक नेते अमोल साळवे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करत साजरी करण्यात आली.
त्याप्रसंगी त्यांनी आपले विचार व्यक्त करताना आण्णाभाऊ साठे यांचे विचार लेखन समाजातील घराघरात पोहोचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
धोत्रे बु. वि. का. सेवा सह. सोसायटीचे संचालक रभाजी भांड म्हणाले थोर समाजसुधारक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून कथा, कादंबऱ्या, शाहिरी पोवाडे, नाटके लिखाणातून कष्टकरी जनतेत विचाराची बीजे पेरण्यासाठी त्याचा प्रचार व प्रसार केला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना लोकशाहीर ही पदवी दिली त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत असल्याचे सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य
जालिंदर भांड यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार तरुण पिढीने पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी मा. चेअरमन व विद्यमान संचालक भाऊसाहेब भांड व मा.व्हा. चेअरमन भाऊसाहेब कुटे निलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य विजय सासवडे, बाबासाहेब भांड, बाळासाहेब भांड, अशोक आल्हाट, शिवाजी आल्हाट, तसेच प्रविण आल्हाट, किरण आल्हाट, बंटी फाटक, प्रदीप आल्हाट, विशाल रोकडे, शिवाजी रोकडे व महिला सह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब भांड यांनी केले व आभार बाबासाहेब आल्हाट यांनी मांनले.
COMMENTS