--> शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन आयोजित राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे बुद्धिबळ पटावर चाल देऊन उद्घाटन | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन आयोजित राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे बुद्धिबळ पटावर चाल देऊन उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन आयोजित ऑल इंडिया ओपन फिडे रेडींग चे टूर्नामेंट (मानांकन बुद्धिबळ) स्...

अहमदनगर (प्रतिनिधी)- शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन आयोजित ऑल इंडिया ओपन फिडे रेडींग चे टूर्नामेंट (मानांकन बुद्धिबळ) स्पर्धेचे बडी साजन मंगल कार्यालय येथे बुद्धिबळ पाटावर  नागपूर येथील 83 वर्षीय खेळाडू ईश्वर रामटेके व अहमदनगर येथील साडेचार वर्षाचा खेळाडू शर्विल भगुरकर यांच्यात चाल देऊन उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, विश्वस्त पारुनाथ ढोकळे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त शाम कांबळे, प्रकाश गुजराथी, प्रवीण ठाकरे, राशीद इनामदार आदी या खेळाडू उपस्थित होते.                         

या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी विविध राज्यातील प.बंगाल तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील, तालुक्यातील सर्व खेळाडूंचे अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेच्या वतीने मनःपुर्वक स्वागत करुन या स्पर्धेत 185 खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट सर यांनी प्रस्ताविकात संघटने विषयी माहिती सांगून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकित 90 खेळाडू सहभागी झाले आहेत. उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले की दोन वर्षापासून कोरोनाच्या अडचणीमुळे बुद्धिबळ स्पर्धेला खंड पडले असून नगर शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात बुद्धिबळ स्पर्धा घेतली जाते बुद्धिबळ खेळ हा सोपा नसून बुद्धीने खेळावा लागतो, या खेळात बुद्धीचा कस लावावा लागतो व काटेकोरपणे, व योग्य निर्णय घेऊन हा खेळ खेळावा लागतो या खेळामध्ये सक्रिय असून या स्पर्धेत खेळाडू सहभाग घेतात बुद्धिबळ खेळ हा बसून देखील खेळ असला तरी हा सर्व बुद्धीचा खेळ आहे व या खेळामुळेच आपण आपली स्वतःचीच बुद्धी वापरून हा खेळ खेळावा लागतो त्यामुळे या खेळाचे वेगळे पण असून हा खेळ आपण खेळला तर निश्चित खेळाडूंच्या बुद्धीला चालना मिळत असून या खेळासाठी बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांचा नेहमी पुढाकार असून बुद्धिबळ खेळाडू पुढे आला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत असून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.  

अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेला व खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझे सहकार्य व प्रयत्न राहतील. पुढे बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेतली असून बुद्धिबळ खेळात अहमदनगर शहर हा मागे कधीच नसतो व मी पंधरा वर्षापासून बुद्धिबळ स्पर्धेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत असून दरवर्षी दोन्ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात राज्यातून व राज्याबाहेरील खेळांडुचा प्रतिसाद मिळत आहे व आम्ही प्लेअर चेस लीग ही संकल्पना अहमदनगर मधून चालू केली त्याला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आता पहिल्यांदाच जानेवारी महिन्यात होणारी आंतरराष्ट्रीय मानांकित 1600 च्या खाली ऑल इंडिया रेटिंग कॉम्पिटिशन आम्ही अहमदनगर शहरात तीन दिवसीय स्पर्धा घेणार असल्याचे जाहीर केले व या स्पर्धेतून विविध राज्यातून खेळाडू आले असून बुद्धिबळ खेळ वाढत असल्याचे सांगितले.  

या स्पर्धेत पंच प्रवीण ठाकरे (जळगाव) रशिद इनामदार (पुणे) ,पारुनाथ ढोकळे (नगर ) हे काम पाहत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिव यशवंत बापट सर, खजिनदार सुबोधजी ठोंबरे, विश्वस्त पारुनाथ ढोकळे सर, विश्वस्त शाम कांबळे, प्रकाश गुजराथी, संजय खडके, दत्ता धाडगे, विद्याधर जगदाळे, विष्णू कुद्रे , गोरक्षनाथ पुंड, नवनीत कोठारी, देवेंद्र ढोकळे, चेतन कड, मनिष जसवानी , डॉ. स्मिता वाघ, अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे हे परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार खजिनदार सुबोधजी ठोंबरे यांनी मांनले...........

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन आयोजित राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे बुद्धिबळ पटावर चाल देऊन उद्घाटन
शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन आयोजित राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे बुद्धिबळ पटावर चाल देऊन उद्घाटन
https://lh3.googleusercontent.com/-NHOKAt8fEVw/Y2saN6lxEmI/AAAAAAAAN5I/GS-pFd9hJBI32mhI7SuBlbT0JyEBr1bRQCNcBGAsYHQ/s1600/1667963446340780-0.png
https://lh3.googleusercontent.com/-NHOKAt8fEVw/Y2saN6lxEmI/AAAAAAAAN5I/GS-pFd9hJBI32mhI7SuBlbT0JyEBr1bRQCNcBGAsYHQ/s72-c/1667963446340780-0.png
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/11/blog-post_96.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/11/blog-post_96.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content