नगरसेवक समद खान, बाबा खान एक वर्षासाठी स्थानबद्ध


वेब टीम : अहमदनगर
राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद खान याच्यासह अंडा गँगचा प्रमुख बाबा खान याला संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये दोन वर्षांसाठी शहरातून स्थानबद्ध करण्यात आले. तसा आदेश जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी आज काढला आहे. या दोघांना स्थानबद्ध केल्याने मुकुंदनगर परिसरात खबरदारी घेण्यात येत आहे. अंडा गँगच्या सदस्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे.

समद वहाब  खान (वय 47 रा. मुकुंदनगर ) याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा प्रयत्न, विनयभंग, मारहाण, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे असे विविध स्वरूपाचे  तीन गुन्हे दाखल होते.

शेहबाजउर्फ बाबा उर्फ बाबा अंडा जाफर खान ( वय 32, रा. मुकुंदनगर ) याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प, कोतवाली, तोफखाना या पोलिस ठाण्यांमध्ये सरकारी कामात अडथळा, दंगा करणे, धमकी देणे, मारहाण, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल होते. यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे.

या दोघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संघटित महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषय गुन्हेगार, विना परवाना शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे (एमपीडीए) या कायद्यान्वये दोन वर्षाकरिता स्थानबद्ध करावे असा प्रस्ताव पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्याकडे सादर करण्यात आला होता. तो प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडून मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी त्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पोलिस पथकाने वरील दोघांना तात्काळ ताब्यात घेऊन स्थानबद्धतेची कारवाई केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post