घड्याळ बंद पडले; आता चिन्ह धनुष्यबाण : ना. जयदत्त क्षीरसागर


वेब टीम : बीड
पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर विकास कामे करणे गरजेचे आहेत आता धनुष्य बाण हातात आहे घड्याळ बंद पडले आहे, असे सांगून विरोधकांनी दुसर्‍याच्या उट्या काढत बसू नयेत विकासाची कामे करून दाखवावीत असे प्रतिपादन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री ना.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन रस्ते कामांचा आणि गोरक्षनाथ टेकडी येथील रस्ते सुधारणा कामांच्या एकूण चार कोटी १७ लक्ष रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री ना.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला.

बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी, ढेकणमोहा येथे झालेल्या या भूमिपूजन  समारंभास गोरक्षनाथ टेकडी देवस्थानचे ह.भ.प. शांतीब्रम्ह नवनाथ महाराज, ह.भ.प.उध्दव महाराज चोले, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, प्रा.जगदीश काळे, अरुण डाके, विलास बडगे, दिलीप गोरे, दिनकर कदम, बाळासाहेब अंबुरे, नितीन धांडे, गणपत डोईफोडे, शिवाजीराव फड, ऍड.राजेंद्र राऊत, बप्पासाहेब घुगे, चंद्रकांत फड, परमेश्‍वर सातपुते, सखाराम मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

भूमीपूजनानंतर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना ना.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आम्ही बिघडलेले घड्याळ काढून धनुष्य बाण हाती घेतले आहे, स्व.बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि माझे सहकारी माझ्या बरोबर समर्थ पणे साथीला आहेत त्यामुळेच लोकसभा निवडणूकित चांगले मतदान नाळवंडी जि.प.गटातून मिळाले त्यापेक्षाही अधिक मतदान आता विधानसभेला मिळणार आहे असा मला ठाम विश्‍वास आहे. आता धनुष्य बाणाचे चिन्ह आहे घड्याळ बंद पडले आहे. परिवर्तनासाठी ताकतीने साथ द्या. पुढच्या पिढीसाठी विकास कामे महत्वाची आहेत.

 दिलेला शब्द आज पूर्ण करतोय गोरक्षनाथ टेकडीच्या रस्त्यासाठी ३८ लाखाचा निधी टाकला आहे. पुढचा टप्पा पूर्ण रस्ते करून घेण्यासाठी राहील, योजना आणण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. युतीचे सरकार जनतेच्या भल्याचे सरकार आहे हे ओळखून घ्या. बीड-गेवराई मार्गाच्या जमिनीचा मावेजा जसा मिळवून दिला तसा बीड ते परळी मार्गाचा मावेजा देखील मिळवून देऊत. आम्ही घोषणा करत नाहीत तर त्या पूर्णच करतो.

 दुष्काळी मराठवाडा पाण्याच्या प्रश्नाने चिंतेत आहे ही चिंता मिटवण्यासाठी मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे.

यावेळी अंकुश राठोड, संदिप डावकर, अरुण बोंगाणे, गोरख धन्ने, अशोक घुमरे, नारायण माने, संपत गुंदेकर, गोपीचंद गुंदेकर, विशाल घोरड, लहू देवकर, रामनाथ माने, बाबूराव राठोड, विष्णू राठोड, बबन शेलार, मोहन शेलार, दिलीप भोसले, बाबासाहेब घुगे, सरपंच अरुण लांडे, बी.एम.पवार, अच्युत शेळके, रामनाथ काकडे, अशोक गाडे, सुधाकर शिंदे, बालासाहेब मुंडे, हनुमंत बोरगे, रामनारायण जाधव, सुंदर लांडे, नारायण देवकते, विष्णू पवार, अंबादास पवार, राजेंद्र पवार, जितेंद्र भोसले, बाळासाहेब राऊत, बंडू राठोड, स्वरूप राठोड, भगवान पवार, गोवर्धन पवार, विनायक मसवले, सखाराम वाणी, जालिंदर कुटे, पंजाब काकडे, मनोज बेद्रे, जालिंदर कुटे, बिभीषण घुगे, बाळासाहेब वरेकर, नागेश शिंदे, रामा भोगे, बालाप्रसाद जाजू आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post