--> विजेचा शॉक बसल्यास नेमके काय होते? | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

विजेचा शॉक बसल्यास नेमके काय होते?

वेब टीम : मुंबई लहान मुले फार उद्योगी असतात. त्यांच्या काहीतरी कारवाया चालू असतात. विजेच्या उपकरणांशी खेळणे तर मुलांना फारच आवडते. इकडच...


वेब टीम : मुंबई
लहान मुले फार उद्योगी असतात. त्यांच्या काहीतरी कारवाया चालू असतात. विजेच्या उपकरणांशी खेळणे तर मुलांना फारच आवडते. इकडचा बल्ब काढून दुसरीकडे लाव, असली काही कामे करायला मुले नेहमीच तयार असतात. कधी कधी मात्र या गोष्टी अंगलट येतात.

जुनाट वायरवर ओले कपडे वाळत घालणे, प्लगमध्ये खिळा घालणे, बल्ब होल्डरमध्ये बोट घालणे इत्यादीमुळे विजेचा शॉक बसतो. विजेचा शॉक बसला नाही, असा माणूस सापडणे अवघडच आहे. पाणी तापवण्यासाठी बर्‍याच घरात वापरल्या जाणार्‍या इमर्शन रॉडचे बटण चालू असताना पाण्यात हात घातला तरी शॉक बसतो.

विजेचा शॉक हा तसा आपल्याला बारीकसा वा दोन मिनिटे झिणमिण्या आणणारा अपघात वाटला, तरी प्रत्यक्षात मात्र तो जीवघेणा असा गंभीर अपघात ठरू शकतो. आकाशात चमकणारी वीज कोणाच्या अंगावर पडली, तर ती व्यक्ती वाचत नाही.

तिचा जळून अगदी कोळसा होऊन जातो. घरगुती विजेमुळे मात्र कमी-अधिक शक्तीचे धक्के बसू शकतात. डीसी वीज ही एसीपेक्षा जास्त घातक असते. महाराष्ट्रात जवळपास सगळीकडची वीज एसी आहे. आकाशातून पडणारी वीज मात्र डीसीप्रमाणे कार्य करते.

विद्युत धक्क्याचे व शॉकचे दोन प्रकारे परिणाम होतात. एक म्हणजे भाजणे व दुसरे म्हणजे मज्जासंस्था, स्नायू व हृदय यांच्यावर विद्युतप्रवाहाचा परिणाम होणे. विद्युतधक्क्यामुळे हृदयाची गती अनियमित होण्याची किंवा हृदय बंद पडण्याची शक्यता असते.

शॉकमुळे स्नायू अचानक आकुंचन पावतात व त्यामुळे दूर फेकले जाणे, खाली पडणे अशा मोठ्या हालचाली होऊ शकतात. विजेचा शॉक खूप मोठा असेल, तर बेशुद्धी येते किंवा मृत्यूही ओढवतो.

वीज आणि विकास यांची सांगड आहे, हे आपण औद्योगिक क्रांतीपासून अनुभवतोय. पण वीज आणि विनाश यांच्या परस्परसंबंधाची जाणीव आपल्याला अपघातातून अधूनमधून होत असते. वीज हे दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा वापर करताना नीट काळजी घेणे अगत्याचे आहे, अन्यथा जीवावर बेतू शकते.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: विजेचा शॉक बसल्यास नेमके काय होते?
विजेचा शॉक बसल्यास नेमके काय होते?
https://1.bp.blogspot.com/-zqCVyNqkUEs/XXj8ri6nJlI/AAAAAAAAEgQ/jH225SbMySE5YYO3LpnfwfgrfI9Rv8nawCLcBGAsYHQ/s320/19-24-32-images.jpg
https://1.bp.blogspot.com/-zqCVyNqkUEs/XXj8ri6nJlI/AAAAAAAAEgQ/jH225SbMySE5YYO3LpnfwfgrfI9Rv8nawCLcBGAsYHQ/s72-c/19-24-32-images.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/09/What-happens-after-electricity-shock.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/09/What-happens-after-electricity-shock.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content