आदित्य ठाकरे ११ कोटींचे मालक


वेब टीम : मुंबई
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज भरताना सेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य यांच्या आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजस ठाकरे देखील अर्ज दाखल करताना उपस्थित होते.

अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आदित्य यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे.

त्यांनी आपली एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

अशी आहे आदित्य ठाकरेंची संपत्ती
१. बँक ठेवी : १० कोटी ३६ लाख
२. बॉण्ड शेअर्स : २० लाख ३९ हजारांची गुंतवणुक
३. दागिने : ६४ लाख ६५ हजार
४. बीएमडब्यू गाडी : ६ लाख ५० हजार
५. इतर संपत्ती : १० लाख २२ हजार

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post