बीएसएफला अलर्ट; भारतीय हद्दीत दिसले पाकिस्तानी ड्रोन


वेब टीम : दिल्ली
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतीय हद्दीत ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पंजाबमधील फिरोजपूरमधील हुसैनवाला सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी सोमवारी रात्री पाकिस्तानच्या हद्दीतून भारतीय हद्दीत ड्रोन येताना पाहिले.

याप्रकारानंतर सीमेवर दक्षतेचा इशारा देण्यात आला असून बीएसएफलादेखील अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बीएसएफने पंजाब पोलीसांना याबाबत माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

याआधी पाकिस्तानने दहशतवाद्यांना हत्यारं पुरवण्यासाठी छोट्या ड्रोनचा वापर केला होता. भारतीय हद्दीत जीपीएसच्या माध्यमातून चालणारे अनेक ड्रोन शिरले होते.

या ड्रोनच्या माध्यमातून 10 किलोंपर्यंत सामान वाहून नेता येत असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post