फडणवीसांचे 'ते' पाऊल माझ्यासाठी धक्कादायक : पंकजा मुंडे


वेब टीम : मुंबई
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या गनिमी काव्याची कल्पना होती का, या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला काहीच कल्पना नव्हती.

पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य असली तरी मला त्या निर्णयाबद्दल काही माहीत नव्हते. जेव्हा मी शपथविधी पाहिला तेव्हा  मला धक्का बसल्याचे त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे हा माझ्यासाठी एक धक्का होता.

त्या म्हणाल्या की, राज्य राष्ट्रपती राजवटीतून बाहेर पडले त्याचा मला आनंद झाला होता. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी अभिनंदन केले. पण मला या सरकार स्थापनेने फार आनंद झाला नाही. माझ्यासाठी तो धक्का होता.

अजित पवारांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, अजित पवार स्पष्टवक्ते नेते आहेत. पण माझा त्यांच्याशी व्यक्तिशः  कधीही संबंध आला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार काही बोलता येणार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post