वेब टीम : टोकियो भारताने टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळात इतिहास रचला आहे. २३ वर्षीय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भालाफेक स्पर्धेत सु...
भारताने टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळात इतिहास रचला आहे. २३ वर्षीय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे.
नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
भारताला एथलेटिक्समध्ये याआधी एकदाही ऑलिम्पिक मेडल मिळालेलं नाही. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांचे ब्रॉन्झ मेडल सेकंदापेक्षाही कमी अंतरानं हुकलं होतं.
हा दुष्काळ नीरज यंदा संपवेल अशी देशाला आशा होती, आणि नीरजनेही देशाचं स्वप्न पूर्ण केलं. यापूर्वी एशियन गेम्समध्ये नीरजनं गोल्ड मेडल मिळवलं होतं.
COMMENTS