नगर : क्रांतिवीर लहुजी साळवे वस्ताद यांनी तत्कालीन अस्पृश्य समाजातील विविध जाती घटकांच्या युवकांना संघटित करून त्यांना बळ देण्याचे काम के...
नगर :
क्रांतिवीर लहुजी साळवे वस्ताद यांनी तत्कालीन अस्पृश्य समाजातील विविध जाती घटकांच्या युवकांना संघटित करून त्यांना बळ देण्याचे काम केले. इंग्रजांची सत्ता उलथवून लावण्यासाठी त्यांनी हजारो तरुणांना क्रांतिकारक म्हणून घडवण्याचे काम केले. जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी असा ध्यास घेऊन लहुजी वस्ताद यांनी देशासाठी काम केले असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी केले आहे.
क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्याला हार घालून किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिवादन केले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास देखील हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी काळे बोलत होते.
काळे म्हणाले की, लहुजींची स्वतःची वैचारिक बैठक देखील मजबूत होती. त्यांनी त्यावेळी पुण्यामध्ये स्वतःचा आखाडा सुरू करण्याबरोबरच तरुणांना वैचारिकदृष्ट्या देखील घडविण्याचे काम करत इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये युवकांना प्रेरित करण्याचे मोलाचे योगदान लहुजींनी दिले. नगर शहरामध्ये लहुजींच्या असणारा पुतळा हा लहुजींच्या स्मृतींना कायम उजाळा देत आला आहे.
यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, माजी नगरसेविका जरीना पठाण, महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा सरचिटणीस इमरान बागवान, काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉक्टर बापू चंदनशिवे, काँग्रेस क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, सागर दळवी आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी : क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्याला हार घालून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिवादन केले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास देखील हार घालून अभिवादन करण्यात आले.
COMMENTS