नगर - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्यावतीने एप्रिल 2023 घेण्यात आलेल्या परिक्षेत भिंगार येथील ओंकार निकेतनच्या राधिका भरतना...
नगर - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्यावतीने एप्रिल 2023 घेण्यात आलेल्या परिक्षेत भिंगार येथील ओंकार निकेतनच्या राधिका भरतनाट्यम् अॅकॅडमीचा 100 टक्के निकाल लागला, अशी माहिती संचालिका सौ.कविता भांबरे- घोलप यांनी दिली.
या परिक्षेत प्रारंभिक - स्वरा जाधव, वेदांगी बोराडे, इशिका भागवत, संतानिका लोडे, प्रगती अगरवाल. प्रवेशिका प्रथम - सिद्धी आडेप, वेदिका गावडे, प्रणाली रसाळ, ईश्वरी कवाष्टे, प्रचिती शिंदे, तनिष्का दळवी. प्रवेशिका पूर्ण - मृणाली शेरकर, तनिष्का बूरा, आराध्या बुरा, सिद्धी मते, कृष्णा तानवडे, अणुश्री शिंदे. मध्यमा प्रथम - शरण्या बकाल, वैभवी शिंदे, गौरी शिंदे. मध्यमा पुर्ण - गौरी तिकोने.विशारद प्रथम- सिद्धी गांधी, तुलसी ओस्तवाल, शर्ली भंडारी आदिंनी घवघवीत यश मिळविले.
सर्व विद्यार्थ्याना भरतनाट्यम करीता केंद्र प्रमुख ओंकार देऊळगावकर, गायना करीता आदेश चव्हाण (न्यू आर्टस्, संगीत शिक्षक), मृदंग वादक उत्कर्ष दळवी, तसेच आश्लेषा पोतदार यांचे विशेष सहाय्य लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.