महापौर पदाच्या खुर्चीवरील व्यक्तीने नगरसेवकांची लायकी काढणे दुर्दैवी - बोराटे


वेब टीम : अहमदनगर
महापौर पदाच्या खुर्चीवरील व्यक्तीने नगरसेवकांची लायकी काढणे दुर्दैवी आहे, असे म्हणून शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी महापौरांनी इतर कोणाची लायकी काढण्यापेक्षा स्वत:ची लायकी तपासावी असा असे सूचक वक्तव्य बोराटे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना केले.

आपल्यावर आरोप करण्याची नगरसेवक बोराटे यांची लायकी नाही, अशी टीका महापौर वाकळे यांनी केली होती. त्यास शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी (दि.२१) दुपारी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी बोलताना नगरसेवक बोराटे म्हणाले, शिवसेनेचा महापौर असताना नगररचना विभागात भ्रष्ट्राचार करनाऱ्या अभियंता कल्याण बल्लाळ याची अनेक नागरिकांच्या तक्रारीवरून पाणी पुरवठा व विद्दुत विभागात बदली केली. तेथेसुद्धा त्याने नगरसेवक आणि जनतेची कायम अडवणूक केली. असा भ्रष्ट अधिकारी तुम्ही महापौर झाल्यावर ताबडतोब पुन्हा नगर रचना विभागात का घेतला गेला. तुम्हाला घ्यायचेच होते तर अनेक अधिकारी होते पण बल्लाळच का? याच उत्तर आपण आम्हाला द्यावं. असे कोणतं मोठे काम नगर शहरात होते म्हणून त्याची बदली आपण केली. असा सवालही बोराटे यांनी केला.
जनतेमध्ये चर्चा आहे की कुष्ठधाम वरील तीन ते चार एकर जागा कोण-कोणी घेतली व कोण-कोण त्यात सहभागी आहेत याची माहिती जनतेस मिळावी. वैभव जोशी हे म.न.पा.तील नगररचना विभागात सक्षमपणे व प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्याची उचलबांगडी करून बल्लाळला बसवण्याचा घाट अधिकारी व पदाधिकारी का करीत आहेत. तर यांना त्यांनी चुकीच्या पद्धतीने खरेदी केलेल्या जमिनींचे व्यवहार सुरळीत करायचे आहेत, म्हणून हा सर्व उद्योग सुरु असल्याचा आरोप बोराटे यांनी यावेळी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates