येवलेवाडी, 30 : येवलेवाडीतील सन एक्सोटिका या सोसायटी समोर बस थांबा व्हावा याकरिता नागरिकांनी अनेक मागण्या केल्या होत्या. अखेर या...
येवलेवाडी, 30 : येवलेवाडीतील सन एक्सोटिका या सोसायटी समोर बस थांबा व्हावा याकरिता नागरिकांनी अनेक मागण्या केल्या होत्या. अखेर या मागण्याची दाखल घेऊन बस थांबा रविवारी उभारण्यात आला. माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
येवलेवाडीतील बस थांबा जवळ नसल्याने प्रवाशांना पायपीट करीत बस थांब्यावर जावा लागत होते. विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी जवळच बस थांबा होणे गरजेचे होते. मात्र, अनेक निवेदने देवूनही बस थांब्याचा प्रश्न मार्गी लागला नव्हता. पण या सगळ्यात माजी आमदार योगेश टिळेकर यांनी हात घातला आणि बस थांब्यासाठी पाठपुरावा केला.
अखेर बस थांब्याचे काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. योगेश टिळेकर यांच्या हस्ते बस थांब्याचे उद्घाटन करण्यात आले आणि यावेळी नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
येवलेवाडीतील प्रत्येक छोट्या मोठ्या समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू, असे आश्वासन योगेश टिळेकर यांनी नागरिकांना दिले.