मोठी धक्कादाय बातमी पारनेर येथील नगरसेवकाच्या भावाची निर्घृण हत्या हल्लेखोरा पैकी एकास अटक पारनेर प्रतिनिधी : पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक ...
मोठी धक्कादाय बातमी
पारनेर येथील नगरसेवकाच्या भावाची निर्घृण हत्या
हल्लेखोरा पैकी एकास अटक
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक भूषण शेलार यांचा चुलत भाऊ सिध्देश संजय शेलार (वय २०) यांची शिक्रापूर येथे विकी खराडे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे) व त्याच्या इतर दोघा साथीदारांनी धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे पारनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हत्येमागील कारण समजू शकले नसले तरी विकी खराडे हा सिध्देश यास वारंवार जिवे मारण्याची धमकी देत होता, इंस्टाग्रामवर मेसेज करीत होता, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, हल्लेखोरांपैकी एकास पोलिसांनी अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोकराव शेळके यांनी दिली.
यासंदर्भात नगरसेवक भूषण शेलार यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात विकी खराडे व त्याच्या दोघा साथीदारांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.