आमदार निलेश लंके हे आजच्या तरुणाईचे प्रेरणास्थान : दिव्या भोसले आमदार निलेश लंके यांच्या घरी दिव्या भोसले यांची सदिच्छा भेट दिव्या भोसले आम...
आमदार निलेश लंके हे आजच्या तरुणाईचे प्रेरणास्थान : दिव्या भोसले
आमदार निलेश लंके यांच्या घरी दिव्या भोसले यांची सदिच्छा भेट
दिव्या भोसले आमदार लंकेंचे घर पाहून गेल्या भारावून
आमदार निलेश लंके यांच्या मातोश्री व सौभाग्यवतींनी केले दिव्या ताईंचे स्वागत
पारनेर/प्रतिनिधी :
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या घरी अचानक भेट दिली होती. सर्वसामान्य कुटुंबातील असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या घरी राष्ट्रवादीचे पदाधिकारीही आता भेट देत आहेत. जळगाव येथून येऊन प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्याताई भोसले यांनी नुकतीच आमदार निलेश लंके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. आमदार निलेश लंके यांचे घर पाहून दिव्या ताई भोसले या भारावून गेल्या होत्या. सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या दिव्याताई भोसले कमी वयातही राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीची जबाबदारी खासदार सुप्रियाताई सुळे व प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे संभाळत आहे. त्यांचे कार्य आजच्या युवतींना नक्कीच प्रेरणादायी आहे.
आमदार निलेश लंके यांचे समाजासाठी असलेले कार्य पाहून दिव्याताई भोसले यांच्यासाठी आमदार निलेश लंके प्रेरणास्रोत बनले आहेत.
दरम्यान प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक असलेल्या दिव्याताई भोसले यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार निलेश लंके यांच्या मौजे हंगा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या आई(अक्कासाहेब ), वडील (अप्पासाहेब ), पत्नी(राणीताई, जिल्हा परिषद सदस्य), मुले कुटुंबातील इतर सदस्यांनी दिव्याताई भोसले यांचे स्वागत केले. यावेळी दिव्याताई भोसले यांनी कुटुंबातील सदस्यांसोबत मनमोकळा संवाद साधला. सर्वसामान्य असलेले कुटुंब व कुटुंबातील सदस्यांची असलेली साधी राहणी पाहून दिव्याताई भोसले या भारावून गेल्या होत्या.
यावेळी बोलताना दिव्याताई भोसले म्हणाल्या की आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वसामान्य आमदार आहेत त्यांची समाजासाठी सुरू असलेले कार्य नक्कीच आजच्या युवकांना व तरुणाईला प्रेरणा देत आहे. आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेले कार्य हे नक्कीच महाराष्ट्रात उल्लेखनीय असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नावाने कोविड सेंटर उभारून सर्वसामान्य रुग्णांना अडचणीच्या काळात त्यांनी आधार व धीर देण्याचा व मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी प्रयत्न केला आहे.
आमदार लंके यांच्या घरी भेट दिल्यानंतर दिव्याताई भोसले यांनी टाकलेल्या फेसबुक पोस्टमध्ये त्या असे म्हणतात की आदरणीय निलेश लंके साहेब हे त्यांच्या मतदारसंघात करत असलेल्या कामामुळे या भागात लोकप्रिय आहेत. तरीही अत्यंत साधे राहणीमान व प्रेमळ स्वभाव असलेला त्यांचा परिवार आहे. आपल्यातील नेतृत्वगुणांमुळे संघर्ष करून आपल अस्तिव सिद्ध करू शकतो याचा संदेश आदरणीय लंके साहेबांनी आपल्यासारख्या तरुणाईला दिलाय.सर्व कुटूंबियांना भेटून मनस्वी आनंद वाटला.
यावेळी दिव्या भोसले यांच्यासमवेत अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे जिल्हा संघटक माया रोकडे, पारनेर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा स्वाती इंगळे या राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी ही उपस्थित होत्या.
आमदार लंके यांच्या मातोश्री म्हणाल्या दिव्या तू माझ्या लेकी सारखी..
राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी नुकतीच आमदार निलेश लंके यांच्या निवासस्थानी पारनेर तालुक्यातील हंगा येथे भेट दिली. यावेळी दिव्याताई भोसले यांनी आमदार निलेश लंके यांच्या कुटुंबीयांसोबत सुसंवाद साधला यावेळी आमदार लंकें यांच्या मातोश्री अक्कासाहेब यांनी दिव्या तू माझ्या लेकी सारखी आहे असे भावनिक गौरवोद्गार काढले.
आमदार निलेश लंके यांचे साधे घर पाहून दिव्या भोसले गेल्या भारावून.
पारनेरचे आमदार हे सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची राहणीमान ही साधे आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या दिव्या भोसले यांनी आमदार लंके यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांच्या घरातील कुटुंबातील सदस्यांचे असलेले साधे राहणीमान आणि असलेले साधे घर पाहून राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले या भारावून गेल्या होत्या.
आमदार निलेश लंके यांच्या आईवडिलांनी दिव्याताई यांना दिले आशीर्वाद..
राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्याताई भोसले यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या घरी भेट दिली. यावेळी घरातील सदस्यांसोबत त्यांनी विविध सामाजिक राजकीय विषयावर चर्चा केली. दिव्याताई भोसले करत असलेले काम हे सुद्धा उल्लेखनीय आहे. यावेळी आमदार निलेश लंके यांच्या आई-वडिलांनी दिव्याताई भोसले यांना पुढील राजकीय सामाजिक वाटचालीसाठी आशीर्वादही दिले.