किर्तन हे समाज एकत्रीकरणासाठीचे साधन . - हभप खराडे पारनेर/प्रतिनिधी : पुरातन काळात समाज एकत्री करणासाठी आताच्या सारखी प्रबोधनाची साधने नव्ह...
किर्तन हे समाज एकत्रीकरणासाठीचे साधन . - हभप खराडे
पारनेर/प्रतिनिधी :
पुरातन काळात समाज एकत्री करणासाठी आताच्या सारखी प्रबोधनाची साधने नव्हसी . म्हणुन किर्तन हे समाज प्रबोधन आणि एकत्री करणासाठीच असल्याचे प्रतिपादन हभप इानेश्वर महाराज खराडे ( आळंदी)यानी केले .
पारनेर तालुक्यातील कान्हूर पारनेर रोडवरील गणपती चौफुला येथील गणपती मंदिरात आयोजीत ३३व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या किर्तनाने झाली त्या प्रसंगी ते बोलत होते . या वेळी पारनेर राहुरी जुन्नर श्रीगोंदा नगर परिसरातुन भावीकांनी मोठी गर्दी केली होती .
हभप खराडे पुढे बोलताना म्हणाले की आपण समाज्याचे काही तरी देण लागतो याची भावना जपा समाजाचे कल्याण होईल . भगवंत भक्ताचा वाटेत तमोगुण रजोगुण सत्वगुण रूपी काटे टाकूण देतो त्यातुन तरूण जाणाऱ्यानाच परमेश्वर भक्तीची सहानुभूती मिळते
सर्वांगाने समर्पित भावनेने ईश्वर भक्ति मनाला भावते वैर हत्या रिन याची परतफेड करावीच लागते .
जसे कर्म कराला तसेच फळ मिळेल ग्रंथ हेच आपले मार्गदर्शक आणि आदर्श . आहेत त्याची जपवणुक करणे गरजेचे आहे असे सांगुन खराडे म्हणाले या सामाजिक कार्यक्रमातुन एकोपा जपण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे तरच सप्ताह कार्यक्रमाचे फलित होईल असेसांगता प्रसंगी सांगीतले.