जनसेवेसाठी राजेश्वरी'ताई कोठावळे यांनी काम करत राहावे : किरण ठुबे ----------- वाढदिवसानिमित्त वडगाव दर्या येथील आदिवासी कुटुंबातील म...
जनसेवेसाठी राजेश्वरी'ताई कोठावळे यांनी काम करत राहावे : किरण ठुबे
-----------
वाढदिवसानिमित्त वडगाव दर्या येथील आदिवासी कुटुंबातील मुलांना चप्पलचे व खाऊचे वाटप !
पारनेर/प्रतिनिधी :
पठार भागाचे भाग्यविधाते पारनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती कै. रावसाहेब अण्णा ठुबे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा चालवत जाणता राजा प्रतिष्ठान चे अध्यक्ष किरण रावसाहेब ठुबे यांनी सामाजिक उपक्रम राबवत अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांचा वाढदिवस साजरा केला.
केक सारखी असंस्कृत पद्धत बाजूला ठेवत पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथील आदिवासी कुटुंबातील लहान मुलांना पायातील चप्पलचे वाटप तसेच खाऊ वाटप केले. यावेळी राजेश्वरी ताई कोठावळे यांचा जाणता राजा प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना काळातील कामाबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी कान्हूर पठार व वडगाव दर्या परिसरातील अनेक ग्रामस्थ व किरण रावसाहेब ठुबे मित्रपरिवार उपस्थित होता.
अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे या समाज हितासाठी काम करत आहेत त्यांनी कोरोना काळात केलेले काम हे अतुलनीय असून त्यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्या महिला सक्षमीकरणासाठी की काम करत असून या आमच्या भगिनी चा आम्हाला सर्वांना अभिमान आहे जनहितासाठी त्यांनी असेच काम करत राहावे असे यावेळी बोलताना जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण रावसाहेब ठुबे म्हणाले.
यावेळी सुपा ग्रामपंचायत सदस्या सुरेखा'ताई पवार, हंगा ग्रामपंचायत सदस्य मायाताई साळवे, पारनेर राष्ट्रवादी युवती नेत्या माया रोकडे, उद्योजिका स्वातीताई इंगळे, मयुरी झरेकर, शितल पवार, प्रांजल कोठावळे, कल्पना गाडीलकर, ऋतुजा थोरात, बुशरा सय्यद, सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई औटी, अरमान सय्यद, गणेश होले, तसेच वडगाव दर्या ग्रामपंचायत सदस्य सुभाष परांडे व कान्हूर पठार व वडगाव दर्या परिसरातील अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. तसेच आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारीही याप्रसंगी उपस्थित होते.
माझे मोठे बंधू किरणभाऊ ठुबे यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा प्रतिष्ठान च्या माध्यमातून जो सामाजिक उपक्रम राबवला तो खरंच कौतुकास्पद आहे. पठार भागावर किरणभाऊ ठुबे यांच्यासारखे नेतृत्व उत्तम काम करत आहे. त्यांना भविष्यात राजकीय दिवस चांगले असून सामाजिक कामांच्या माध्यमातून त्यांनी जनतेची सेवा करत राहावी.
राजेश्वरीताई कोठावळे
(जिल्हाध्यक्षा : राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी अहमदनगर)


