अहमदनगर प्रतिनिधी : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती १४ तारखेला पार पडली. शहराच्या आमदारांच्या हस्ते स्वराज्यरक्षक छत्र...
अहमदनगर प्रतिनिधी : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती १४ तारखेला पार पडली. शहराच्या आमदारांच्या हस्ते स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या चौथरा कामाचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र चार दिवस उलटले तरी देखील प्रत्यक्षात कामाला सुरुवात नव्हती. ही छत्रपती प्रेमींची फसवणूक असल्याचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला होता. तात्काळ कामाला सुरुवात केली नाही तर आंदोलनाचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता. काँग्रेसच्या दणक्यानंतर चौथर्याच्या कामाला तात्काळ महापालिकेने सुरुवात केली आहे.
शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्ते घोटाळा प्रकरणातील रस्त्यांच्या गुणवत्ता पडताळणी चाचणी आंदोलना वेळी नियोजित स्थळाची पाहणी शुक्रवारी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत आरती यावेळी करण्यात आली होती. महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यात आला होता. काँग्रेसच्या आक्रमक विकीनंतर मनपाने शनिवारी सकाळी तात्काळ कामाला सुरुवात केली आहे.
काळे म्हणाले की, भूमिपूजन झाले. कुदळ जिथे मारली ते ठिकाण आम्ही शोधले. मात्र त्याच्या कोणत्याही साध्या खुणा सुद्धा इथे सापडायला नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचा विषय हा शिवप्रेमींसाठी जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे कुणीही शिवप्रेमींच्या भावना दुखावू नयेत. महापुरुषांच्या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर तात्काळ हे काम सुरू होणे गरजेचे होते. मात्र चार दिवस लोटले तरी देखील या ठिकाणी कोणत्या ही प्रकारचे काम सुरू झाले नव्हते. ही संतापजनक बाब आहे. यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा वर्षभरापूर्वी जाहीर करण्यात आला होता. प्रत्यक्षात केवळ रंगरंगोटी करून त्यावेळी देखील शिवप्रेमींची फसवणूक करण्यात आली होती, असे काळे यांनी म्हटले आहे.
आयोजकांचा निषेध :
भूमिपूजन कार्यक्रमानंतर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा असणारे फ्लेक्स बोर्ड कार्यक्रम स्थळी अस्ताव्यस्त पडले होते. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या दुर्दैवी प्रकाराचा यावेळी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, उषाताई भगत, राणीताई पंडित, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, आकाश अल्हाट, प्रणव मकासरे, सोफियान रंगरेज, किशोर कांबळे, अजय मिसाळ, आरिफ शेख, फिरोज शेख, ज्ञानदेव कदम, विष्णू गायकवाड, गणेश आपरे, कल्पक मिसाळ, संतोष निकाळजे, विशाल मकासरे, अक्षय साळवे, विशाल सदावर्ते, ऋषिकेश वारकड, सुनील देशमुख, मोहनराव वाखुरे, अमर डाके, बाबासाहेब वैराळ, जयराम आखाडे, दीपक काकडे, संतोष भालेराव, विजय शिंदे, बलभीम कदम, राजेंद्र तरटे, शकील शेख, जितू बोरा, रफिक शेख, विश्वनाथ सानप आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोबत : आरतीचा फोटो,अस्ताव्यस्त पडलेल्या फ्लेक्स बोर्डचा फोटो व शनिवारी सकाळी मनपाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कामाचा फोटो जोडला आहे.