रावणाची लंका जाळली, लंकेची लंका जाळायला...... ढवळपुरीत आमदार लंकेंवर गोपीचंद पडळकर यांची टीका काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर पारनेर/प्रतिनि...
रावणाची लंका जाळली, लंकेची लंका जाळायला......
ढवळपुरीत आमदार लंकेंवर गोपीचंद पडळकर यांची टीका
काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर
पारनेर/प्रतिनिधी :
भाजपचे विधान परिषदेचे आमदार धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचा पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते मेळाव्याला संबोधित करताना. आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार, रोहित पवार, पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला टीका करताना त्यांनी पवार घराण्याने कशा पद्धतीने अहिल्यादेवींच्या चौंडी येथील जयंती कार्यक्रमात राजकारण केले हे सांगताना पवारांवर चांगलाच हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की रावणाची लंका एकट्या हनुमानाने जाळली होती या लंकेची लंका जाळायला इथले बांधव सक्षम आहेत पवारांना बरं वाटावं म्हणून पारनेरचे आमदार लंके माझ्यावर टीका करत आहेत मी त्यांना ओळखतही नाही तरी ते माझ्यावर टीका करतात. .असा हल्ला ढवळपुरी येथील धनगर मेळाव्याच्या कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी आमदार लंके यांच्यावर आपल्या भाषणातून चढवला.
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे गोपीचंद पडळकर यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार लंके यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणातून चांगलाच समाचार घेतला.