सावेडी कचरा डेपो हलवा; अन्यथा आंदोलन : आ. संग्राम जगताप यांचा इशारा


DNALive24 :
 सावेडी कचरा डेपोला आग लागल्यानंतर आता या प्रश्नावरून राजकारण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आ. संग्राम जगताप यांनी डेपोला भेट देऊन माहिती घेतली. मनपाने हा कचरा डेपो येत्या 10 जूनपर्यंत बंद न केल्यास आंदोलन कारचा इशारा त्यांनी दिला आहे.


ते म्हणाले की, सावेडी परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या कचरा डेपोला कचरा डेपोच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासनाकडे यापूर्वी अनेकदा पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने या कचरा डेपोकडे दुर्लक्ष केले. या कचरा डेपोला आता दुसऱ्यांदा आग लागण्याची घटना घडली आहे.

सदर कचरा डेपो हलवण्याचे प्रशासनाने यापूर्वीच लेखी आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची आतापर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. आताही प्रशासनाला पत्र दिले असून त्यावर कारवाई न झाल्यास 10 जून रोजी नागरिकांसमवेत महापालिकेसमोर धरणे आंदोलन करणार आहोत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post