..मग जिल्हा विभाजनावर बोला - खा.विखे


वेब टीम

अहमदनगर - जिल्ह्यात आधीच अधिकाऱ्याची कमतरता आहे₹. जिल्हा विभाजन करून आणखी अडचण कशाला ? माझा विरोध किंवा समर्थन नाही, पण जिल्हा जिल्हा विभाजनावर जितका खर्च होणार आहे तितका खर्च आधी जिल्ह्यातील सिचनाच्या कामांसाठी वापरवा. जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवा. नंतर नव्या जिल्ह्याचे मुख्यलय कोणते ते मी सांगतो, असे स्पष्ट मत व्यक्त खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हा विभजनावर व्यक्त केले.

          शनिवारी(दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. पालकमंत्र्यांनी यांच्या पत्रकार परिषदेत जिल्हा विभाजन होणारच त्यासाठी कोणाचाही विरोध नाही असे सांगितले होते. त्यानंतर लगेच खासदार विखे यांना पत्रकारांनी जिल्हा विभाजनाच्या मुद्यावर विचारणा केली. त्यावर त्यांनी विभागाला अप्रत्यक्ष विरोध केला. मात्र, पालकमंत्र्यांनी विभाजन होणार असल्याचे त्यांना समजले. त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव करत आपण पालकमंत्र्यांच्याभूमिकेशी असल्याचे सांगितले. पालकमंत्री व मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करू. मात्र विभाजनासाठी येणाऱ्या खर्चतून सिचनाची कामे करून लोकांना पाणी द्या, त्यानंतर मुख्यालय कोणते ते सांगतो असे ही खा.विखे म्हणले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post