बिहारमधून महाराष्ट्रात मुलांची तस्करी?


वेब टीम : पाटणा
बिहारमधून महाराष्ट्रात लोक रोजगारासाठी येतात हे आता काही नवं राहिलेलं नाही. महाराष्ट्रातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये बिहार, उत्तरप्रदेश आणि झारखंडमधली लोकं आता स्थिरावली आहेत. मात्र रेल्वे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत धक्कादायक खुलासा झालाय. महाराष्ट्रात मजुरीसाठी आणल्या जाणाऱ्या 33 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केलीय.

छत्तीसगडच्या राजनंदगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. हावड्यावरून मुंबईला जाणाऱ्या गाडीत संशयास्पद मुलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गाडीत S-5 आणि S-7 या डब्ब्यांमध्ये अशी मुलं असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने या डब्यांमध्ये तपासणी केली. तेव्हा त्यांना ही मुलं आढळली. या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या एका वकिलाने ही माहिती पोलिसांना कळवली होती.

ही सर्व मुले 7 ते 13 या वयोगटातली आहेत. या सर्व मुलांना मदरशांमध्ये घेऊन जात असल्याचं या मुलांसोबत असलेल्या आरोपीने सांगितलं. मात्र त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रं नव्हती. या मुलांना नंदूरबारमध्ये घेऊन जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. या मुलांसोबत तीन मोठ्या व्यक्ती होत्या त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर मुलांना सुधारगृहात पाठविण्यात आलंय. छत्तीसगड पोलीस बिहार पोलिसांशी संपर्क साधून प्रकरणाचा तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates