नेवाशातून भाजपच्या तिकिटावर कुणाला संधी? लंघे की गडाख?


DNALive24 वेब टीम : अहमदनगर
नेवासा तालुक्याचे भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतही माजी आ. शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने बाजी मारली. सततच्या अपयशामुळे विधानसभेला भाजपतर्फे नेवाशातून विद्यमान आ. मुरकुटे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे अथवा माजी आ. शंकरराव गडाख यांच्यापैकी कुणाला भाजपकडून संधी मिळणार? याची उत्सुकता लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी mr.dnalive24.comचे फेसबूक पेज लाईक करा

२०१४ साली असलेल्या मोदी लाटेपुढे अशक्यप्राय वाटणारी नेवाशाची जागा भाजपने जिंकली. गडाख विरोधकांची एकी व भाजपची लाट यामुळे मुरकुटे आमदार झाले. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडुकीपासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतीच्या निवडणुकीतही अपवाद वगळता मुरकुटे यांना अपयशाचा सामना करावा लागला. नुकतीच सोनई पंचायत समितीची पोटनिवडणूक झाली. त्यातही क्रांतिकारीचे डफाळ निवडून आले. पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी शिवसेना सोडून आलेल्या प्रकाश शेटे यांचा आ. मुरकुटे यांनी राजकीय बळी दिल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.

ताज्या बातम्यांसाठी mr.dnalive24.comचे फेसबूक पेज लाईक करा


२००९ साली शंकरराव गडाखांच्या विरोधात निवडणूक लढवून तब्बल ९० हजार मते मिळविलेल्या विठ्ठलराव लंघे यांनी नंतर गडाखांच्या साथीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले. अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मुलगी तेजश्रीला पुढे करून लंघे सक्रिय राजकारणातून थोडे बाजूलाच पडले होते. आता विधानसभा जवळ आल्याने त्यांनीही तयारी सुरु केली आहे. कार्यकर्त्यांच्या भेटींसह भाजपमधील जुन्या सहकाऱ्यांना तिकिटासाठी गळ घालण्यास त्यांनी सुरुवात केल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी mr.dnalive24.comचे फेसबूक पेज लाईक करा

मध्यंतरी मुळा एज्युकेशन अडचणीत आल्याने गडाखांची कोंडी झाल्याची परिस्थिती होती. त्यासाठी त्यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याच्याही चर्चा होत्या. काही महिन्यांपूर्वी नागपुरातील एका बड्या मंत्र्याच्या घरी असलेल्या एका समारंभासाठी बोलावलेल्या निवडक व्यक्तींमध्ये युवा नेते प्रशांत गडाख यांचा समावेश होता. त्यामुळे गडाखांची पुढची वाटचाल भाजपमधून तर नाही ना? अशी शंका वाढत आहे.

ताज्या बातम्यांसाठी mr.dnalive24.comचे फेसबूक पेज लाईक करा


त्यातच विखेंचा भाजप प्रवेश झाल्यानंतर त्यांच्यावर जिल्ह्यातील सर्व जागा निवडून आणायची जबाबदारी पक्षाने टाकली आहे. त्यामुळे विनिंग कँडिडेड लाच तिकीट देण्यात येण्याची शक्यता आहे. गडाख व लंघे यांच्यात तिसरा पर्याय म्हणून भाजपकडून मराठा महासंघाचे नेते संभाजी दहातोंडे यांच्याही नावाचा विचार केला जाऊ शकतो. मुख्यमंत्र्यांशी असलेली त्यांची सलगी लपून राहिलेली नाही. त्यामुळे नेवासा तालुक्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post