$type=ticker$snippet=hide$cate=0

जलसंधारणासाठी जनआंदोलन उभं करावं; पंतप्रधान मोदींचे आवाहन

वेब टीम : दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये पहिल्यांदा 'मन की बात'द्वारे जनतेशी संवात साधला. यावेळी ...


वेब टीम : दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये पहिल्यांदा 'मन की बात'द्वारे जनतेशी संवात साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी जल संरक्षणाचं महत्त्व बोलून दाखवलं आणि देशातील विविध भागातील पाणीटंचाईवरही भाष्य केलं. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या याबाबतही माहिती दिली.
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. देशातील नागरिकांना ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाला जन आंदोलनाचं स्वरुप दिलं होतं, त्याप्रमाणे जलसंधारणासाठीही सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
देशात जलसंधारणाच्या अनेक पारंपरिक पद्धती आहेत, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत. त्या विविध पद्धतींची माहिती एकमेकांना दिली पाहिजे. तसेच जलसंधारणासाठी काम करणाऱ्या एखाद्या व्यक्ती किंवा खासगी संस्थेबद्दल माहिती असल्यास, त्याची माहिती इतरांना दिली पाहिजे, असंही नरेंद्र मोदींनी सांगितलं.
देशात पाणी प्रश्न आजच्या स्थितीत गंभीर बनत चालला आहे. त्यासाठी लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान चालवायला हवे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. पाण्याच्या संरक्षणासाठी लोकांनी #JanShakti4JalShakti या हॅशटॅगचा उपयोग करत सोशल मीडियावर आपल्याकडील माहिती शेअर करावी, असंही मोदींनी आवाहन केलं.
देशातील जनतेने पुन्हा देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल नरेंद्र मोदींनी सर्वांचे आभार मानले. जनतेला विकास हवा आहे, म्हणून त्यांनी पुन्हा देशसेवा करण्याची संधी दिल्याचं त्यांनी म्हटलं. सत्तेत मी आलो नाही, तर लोकांनीच मला परत आणले आहे, असंही मोदींनी म्हटलं.

COMMENTS

Name

Agriculture,272,Ahmednagar,828,Astrology,20,Automobiles,74,Breaking,3641,Cricket,120,Crime,932,Education,121,Entertainment,193,Health,579,India,1287,Lifestyle,20,Maharashtra,1997,Politics,2231,Sport,164,Technology,142,Vidhansabha2019,356,World,588,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates: जलसंधारणासाठी जनआंदोलन उभं करावं; पंतप्रधान मोदींचे आवाहन
जलसंधारणासाठी जनआंदोलन उभं करावं; पंतप्रधान मोदींचे आवाहन
https://1.bp.blogspot.com/-NhIpcs5WX00/XRh6iGJ18_I/AAAAAAAADa0/N_BRb5CPI5MLE1jqBIDb0nb7JsWje0BBwCLcBGAs/s320/PM-narendra-Modi1.jpg
https://1.bp.blogspot.com/-NhIpcs5WX00/XRh6iGJ18_I/AAAAAAAADa0/N_BRb5CPI5MLE1jqBIDb0nb7JsWje0BBwCLcBGAs/s72-c/PM-narendra-Modi1.jpg
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://mr.dnalive24.com/2019/06/pm-man-ki-baat.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/06/pm-man-ki-baat.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content