वनकुटे येथील प्रगत विद्यालयात विद्यार्थ्यांनासाठी लसीकरण मोहिम. भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक संस्थेने राबविला अभिनव उपक्रम सर्व विद्यार्थ्...
वनकुटे येथील प्रगत विद्यालयात विद्यार्थ्यांनासाठी लसीकरण मोहिम.
भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक संस्थेने राबविला अभिनव उपक्रम
सर्व विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे गरजेचे.
प्रत्येक विद्यालयात उपस्थित राहुन लसीकरण पुर्ण करून घेणार:- संस्थेचे अध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे प्रतिपादन
पारनेर प्रतिनिधी :
वनकुटे येथे सुजित झावरे पाटील यांच्या उपक्रमातुन प्रगत विद्यालय मधील सर्व विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना झावरे पाटील म्हणाले की कोरोना ह्या आजाराचे रुग्ण पुन्हा जास्त प्रमाणात सापडत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना पासुन जर आपला बचाव करायचा असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी ही लस घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
मी स्वतः संस्थेच्या प्रत्येक विद्यालयात जाऊन ही लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी सुरेशनाना गागरे, चेअरमन काशिनाथ बुचुडे, डॉ नितीन रांधवन,भास्कर शिंदे, पोपटराव डुकरे, दत्ता काळनर, तात्याभाऊ मुसळे, दिपक गुंजाळ, बापु काळनर, संतोष केदारी, साहेबराव डुकरे,भिमराज गांगड, निवृत्ती साळवे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पवार सर,वनकुटे आरोग्य केंद्र डॉ झावरे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS