सुप्यात ट्रकची सायकलला धडक कंपनी कामगार ठार पारनेर प्रतिनिधी : हंगा ता. पारनेर येथुन सायकलवरुन सुपा एमआयडिसीत येत आसलेल्या कंपनीतील कामगारा...
सुप्यात ट्रकची सायकलला धडक कंपनी कामगार ठार
पारनेर प्रतिनिधी :
हंगा ता. पारनेर येथुन सायकलवरुन सुपा एमआयडिसीत येत आसलेल्या कंपनीतील कामगाराला ट्रकने पाठीमागुन धडक दिल्याने कंपनी कामगाराचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सौ. बिबादेवी राजाराम माथुर यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. माझे पती मयत राजाराम किसन माथुर वय ५२ रा. वांद्रे, मुंबई हल्ली मुक्कामी हंगा तालुका पारनेर हे सोमवारी रात्री हंगा येथुन सुपा येथील साईदिप कंपनीत कामासाठी येत आसताना सुपा पारनेर रस्त्यावरील हंगा शिवारात रात्री ८.०० वाजण्याच्या दरम्यान पारनेरकडून सुप्याच्या दिशेने येत आसलेल्या ट्रक क्रमांक MH 16 T 7307 या वहानने सायकल वरील माझ्या पतीला जोराची धडक दिली यात ते गंभीर जखमी होऊन मृत पावले.
घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनची टिम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व सदर जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले.
सुपा पोलिसांनी सौ. बिबादेवी राजाराम माथुर यांच्या फिर्यादीवरुन ट्रकचालक संतोष धोंडीबा चत्तर यांच्या वर भा. द. स. क, ३०४, २७९, ३३७, ३३८, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कँ यंशवत ठोबरे पुढील तपास करत आहेत. अपघातास कारणीभूत आसलेला ट्रकचालक मध्यपाण केलेला होता का की गर्दीमुळे किंवा रस्तावरील अंधारामुळे हा अपघात झाला असावा या दृष्टीने ही सुपा पोलिस तपास करत आहेत.
COMMENTS