जामखेडला वादळी पावसाचा तडाखा


DNALive24 : वेब टीम, जामखेड
तालुक्यात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र या पावसात हाळगाव व आगी येथे चारा छावणीमध्ये वीज पडून तीन जनावरे दगावली. तर परिसरातील अनेक घरावरील पत्रे उडाली.

जामखेड तालुक्यात मंगळवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक जोराचा वारा सुटल्याने छावण्यांतील जनावरांसह शेतकऱ्यांचे चांगलेच हाल झाले. वाऱ्यामुळे परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडाले तर हाळगाव व आगी येथील चारा छावणीमध्ये वीज पडून तीन जनावरे दगावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या भागातील अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post