पुण्यात पवारांना भाजपचा शह : विखे पाटील होणार पालकमंत्री?


DNALive24 : वेब टीम, मुंबई
गिरीश बापट हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज पुण्याचे पालकमंत्री पद सोडणार आहेत, बापट यांनी काल हि घोषणा केली होती, त्यानंतर आता पुण्याचा नवीन पालकमंत्री कोण होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून आगामी विधानसभा निवडणूक पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे विरोधक राधाकृष्ण विखे पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री करण्याची हालचाल सुरु केली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पवार आणि विखे पाटील यांच्यामध्ये रंगलेला कलगीतुरा राज्याने पहिला आहे. यामध्ये आता निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे एका बाजूला विखे पाटील यांचे पुनर्वसन करताना पवारांची कोंडी केली जाऊ शकते.

दरम्यान, गिरीश बापट दिल्लीला गेल्यानंतर आता पालकमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, चिंचवडचे आ लक्ष्मण जगताप, आ माधुरी मिसाळ यांची नावे देखील पालकमंत्री पदासाठी आघाडीवर आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post