जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्यावर अविश्वास ठराव


वेब टीम : अहमदनगर
माजी सैनिकाच्या शिक्षिका पत्नीच्या बदलीबाबत वारंवार सांगूनही जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी बदली केली नाही.  याच्या निषेधार्थ अध्यक्षा शालिनीताई विखे पा. यांच्यासह अन्य जि.प.सदस्यांनी सभात्याग करत सभागृह सोडून निघून गेले.

याबाबत जिल्हा परिषदेची तहकूब सभा व विशेष सभा ही दि.8 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्यावर अविश्वासाचा ठराव होणार आहे. तो ठराव शासनास पाठविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पा. यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा घुले, जि.प. सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, काकडे, नागवडे, आदींसह जि.प. सदस्य, पंचायत समिती सभापती आदीसह सर्व समितीचे सभापती उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post