नगर कल्याण महामार्गावर अपघात ; 1 ठार,४ जखमी


वेब टीम : अहमदनगर
नगर कल्याण महामार्गावर कंटेनर व एसटी बसची जोराची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एस टी पलटी झाल्याने बसमधील 4 प्रवासी गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.


याबाबत समजलेली माहिती अशी की, कल्याण महामार्गावर नगर - पारनेर (एम एच 40 एन 8756) ही एसटी बस अहमदनगरच्या दिशेने जात होती. यावेळी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बस व कंटेनर या दोन्ही वाहनांची  बायपास चौकामध्ये  समोरा-समोर धडक झाली. हा अपघात भीषण असल्याने बस  उलटी झाली. या घटनेची  माहिती समजताच पोलिसांंनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post