भाजपाला बकासुरासारखी सत्तेची हाव : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. थोरतांचा हल्लाबोल


वेब टीम : मुंबई
केंद्रात सत्ता आणि इतर राज्यात भाजप पक्ष आहे पण विरोधकांच्या हातातील राज्य ही भाजपाला हवे आहे बकासुरा सारखी सत्तेची हाव भाजपाला लागली आहे असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. प्रत्येक गोष्टीला चढउतार असतात. कॉंग्रेस मोठ्या ताकदीनं पुढे येईल.

कॉंग्रेस पुन्हा भरारी घेईल असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते त्यामुळेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षाकडे अर्ज करत आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विभाग निहाय बैठक घेत आहे, कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post