भाजपचा पुन्हा मराठा पॅटर्न, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड


वेब टीम : मुंबई
भाजपने प्रदेशाध्यक्ष पदावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची निवड केली आहे. पाटील यांची निवड करून भाजपने पुन्हा एकदा मराठा पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने टाकलेला डाव पक्षासाठी किती फायदेशीर ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी पक्षाने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती केली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरु होत्या. प्रदेशाध्यक्षपदासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील व अहमदनगर जिल्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा सुरु होती.

चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या अडीच महिन्यांवर आल्या असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील हे स्पष्ट झाले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही वेळामध्येच चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दानवे यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वितीय केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदावर वर्णी लागली. दानवे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदासाठी विनोद तावडे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post