नगरजवळ बॉम्बच्या स्फोटात दोघांचा मृत्यू


वेब टीम : अहमदनगर
येथील लष्करी हद्द असलेल्या के के रेंज जवळील खारेकर्जुने परिसरात बॉम्बचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

आकाश गायकवाड व संदिप धिरवडे अशी दोघांची नावे आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

खारेकर्जुने येथील केके रेंजच्या प्रतिबंधीत परिसरात भंगार गोळा करण्यासाठी काही जण गेले असता मंगळवारी (दि.९) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. लष्करी सरावावेळी न फुटलेला बॉम्ब फुटून भंगार गोळा करणाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post