सराईत चोरटे अटक ; एलसीबीची कारवाई


वेब टीम : अहमदनगर
दिवसा घरफोडी करणारी सराईत चोरट्यांची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. युवराज अर्जुन ढोणे (रासकर वस्ती मिरजगाव ता कर्जत जि अहमदनगर), जीवन नाना गिरगुणे (रा. श्रीराम नगर, मिरजगाव  जि.अ.नगर) व प्रकाश सुभाष पाटील (रा.वाकी, ता.आष्टी जि.बीड) अशी पकडण्यात आलेल्यांंची नावे आहेत तर अविनाश अर्जुन  ढोणे व अक्षय उर्फ आकाश बाजीराव गायकवाड ही दोघे फरार आहेत.


याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की अटक केलेल्या युवराज ढोणे, जीवन गिरगुणे व प्रकाश पाटील या तिघांनी आरोपींनी नगर जिल्ह्यात तोपखाना सुपा व श्रीगोंदा हद्दीतील गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सोलापूर जिल्हा, पुणे शहर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. आरोपी युवराज ढोणे याच्यावर स्वारगेट दिघी कोतवाली हडपसर बारामती जि सोलापूर जिल्ह्यात जोडभावी विजापूर नाका एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत जीवन गिरगुणे याच्यावर बारामती व यवत पोलीस ठाण्यात तर युवराज ढोणे हा बारामती तालुका पोलीस ठाण्यात 3 गुन्ह्यात फरार होता स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार सपोनि.संदीप पाटील, पोहेकाँ.दत्तात्रय हिंगडे, पोना.सुनिल माळी, दीपक शिंदे, सुनिल चव्हाण, संदीप पवार, भागीनाथ पंचमुख, रवि सोनटक्के, रविंद्र कर्डीले, पोकाँ.मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, बाळासाहेब भोपळे आदींच्या पथकाने कारवाई केलु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post