जायकवाडी धरणातून पाणी उपसा बंदी; माजी आ. घुले यांचा विरोध


वेब टीम : अहमदनगर
जायकवाडी धरणातून शासनाने केलेल्या पाणी उपसा बंदीच्या निर्णयाला माजी आ.चद्रशेखर घुले पाटील यांनी विरोध केला आहे.  या निर्णयाने शेतकर्‍यांना हक्काच्या पाणीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


शेतकर्‍यांचा पाणी उपसा बंद करण्यात येत असेल तर औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक औद्योगिक कंपन्यांना होणारा पाणीपुरवठा देखील बंद करणार का? असा प्रश्न उपस्थित करुन या शेतकरी विरोधी निर्णयाचा घुले यांनी निषेध नोंदविला आहे.
शासनाने नुकतेच जायकवाडी धरणामधून 15 ऑगस्टपर्यंत पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जायकवाडी जलाशयातून होणार्या पाणी उपश्यातून शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील 3 लाख ग्रामस्थ अवलंबून आहे. एकीकडे टंचाईच्या नावाखाली पाणी उपसा बंद करण्यात येत आहे. तर दुसरीकडे दुष्काळ संपल्याचा बतावणी करुन चारा छावण्या तातडीने बंद करण्याचा निर्णय घेऊन शासन दुटप्पी भुमिका दाखवत आहे. अजूनही दुष्काळी परिस्थिती असलेल्या शेवगाव-पाथर्डी तालुक्यात पुरेश्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. या भागात सर्वात जास्त पिण्याचे टँकर व छावण्या दुष्काळामध्ये चालू होते. अजूनही छावणी चालकांचे बीले अदा करण्यात आलेले नाहीत. एकीकडे शेतकर्यांचे हक्काचे पाणी पळवून, औरंगाबाद येथील औद्योगिक कंपन्यांना पुरवून उद्योगधार्जीन सरकार शेतकर्‍यांचे वाटोळे करत असल्याचा आरोप घुले यांनी केला आहे. पूर्ण दुष्काळी परिस्थिती हटेपर्यंन्त बंद करण्यात आलेल्या चारा छावण्या पूर्ववत सुरु कराव्या, छावणी चालकांचे बिले अदा करावीत. जायकवाडी धरणातील पाणी उपसा पूर्ववत सुरु करण्याची मागणी घुले यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा घुले यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates