कर्जत -जामखेड च्या शाळांमध्ये मिळणार स्वच्छ व शुद्ध पाणी


वेब टीम : जामखेड
कर्जत – जामखेड तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या संकल्पनेतून पन्नास शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर बसवण्यात येणार आहे.  यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून एक कोटी रुपयांचा सीएसआर फंड मंजूर झालेला आहे. लवकरच याबाबत कार्यवाही होणार आहे.

कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रा. राम शिंदे गेली दोन टर्म नेतृत्व करीत आहेत. दशकभराचा विचार करीत असताना त्यांनी या दोन्ही तालुक्यांमधील विकासाचा अनुशेष बऱ्यापैकी भरून काढला आहे. युतीचे शासन सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात प्रा. शिंदे यांचा समावेश झाला. राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली.  आपल्याकडे असलेल्या  विभागांच्या मार्फत राज्याचा त्याचबरोबर पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा कारभार पाहत असताना त्यांनी आपल्या मतदार संघावर विशेष लक्ष ठेवले. गेल्या साडेचार वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी कर्जत जामखेड मध्ये खर्च करण्यात आला. विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आलीच ,त्याचबरोबर महत्वकांक्षी प्रकल्प राबवले. नव्याने सादर झालेल्या  अर्थसंकल्पामध्ये या मतदारसंघातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करून घेण्यात अहमदनगरच्या पालकमंत्र्यांना यश मिळाले. पायाभूत सुविधांवर भर देत असताना दोन्ही तालुक्यातील शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रा .शिंदे यांनी पुढाकार घेतला. या शाळांमध्ये वॉटर प्युरिफाय र बसविण्याचा प्रा. राम शिंदे यांनी संकल्प केला. यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे पाठपुरावा सुद्धा केला. त्या अनुषंगाने संबंधित कंपनीने सीएसआर फंडातून वॉटर प्युरिफायर साठी एक कोटी रुपयांचा निधी कर्जत जामखेड मधील शाळां करिता मंजूर केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post