दुधातून विषबाधा ; 22 विद्यार्थी कोमात


वेब टीम : नाशिक
येवला तालुक्यातील नगरसूल येथील दादमळा प्राथमिक शाळेतील 22 विद्यार्थ्यांना पोषण आहारातील दुधाद्वारे विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. 6) घडला.


विद्यार्थ्यांना सुटीदरम्यान अल्पोपाहारात दूध व खिचडी देण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी दूध पिताना पहिल्या घोटालाच नाक मुरडले. अनेक मुलांनी तोंडातला तो पहिला घोटही फेकून दिला. पण काहींनी आधी दूध व नंतर खिचडी घेतली. सकाळी नऊनंतरच्या अल्पोपाहारानंतर दूध प्यायलेल्या विद्यार्थ्यांना मळमळत होते. त्यानंतर काहींनी घराचा रस्ता धरला तर काहींनी साडेअकराला शाळा सुटेपर्यंत वाट पाहिली. शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना वाटेत विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या.


दरम्यान, जि. प. सदस्या सविता पवार, बाळासाहेब पवार, कांतिलाल साळवे, सरपंच प्रसाद पाटील, ग्रामविकास अधिकारी गोरख निकम, उमेश देशमुख आदींनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. रुग्णालय प्रशासनाने येवला तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक हिरालाल पाटील यांना घटनेची माहिती दिली आहे. नगरसूल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. सूर्यवंशी, एस. आर. कांबळे, आरोग्यसेवक एन. डी. तिरसे यांनी तातडीने उपचार सुरू केले. प्रकृतीत सुधारणा झालेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post