वेब टीम : अहमदनगर शिंदोडी गावच्या शिवारात वाळू उपसा करणाऱ्या चार यांत्रिक बोटी जिलेटीन स्फोटात उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन...
वेब टीम : अहमदनगर
शिंदोडी गावच्या शिवारात वाळू उपसा करणाऱ्या चार यांत्रिक बोटी जिलेटीन स्फोटात उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने महसूलच्या मदतीने ही कारवाई केली. या कारवाईत 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
याबाबत पोलिसाकडून समजलेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्याचे हद्दीतील घोडनदीवरील चिंचणी धरणाचे बॅक वॉटरमध्ये वडगाव शिंदोडी गावचे शिवारामध्ये काही इसम यांत्रीक बोटीचे सहाय्याने चोरुन वाळू नेेत आहे
असे पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांना मिळाली होती.
त्यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.विजयकुमार वेठेकर, पोना.रविंन्द्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पाथरुट, संतोष लोढे, रणजित जाधव, संदीप घोडके, रोहीत
मिसाळ अशांनी मिळून श्रीगोंदा येथे जावून तहसिलदार महेंंद्र माळी-महाजन यांना ही माहीती देण्यात आली.
तहसिलदार महेन्द्र माळी, महाजन, तलाठी जयसिंग मापारी यांचेसह वडगांव शिंदोडी गावचे शिवारात जावून खात्री केली. सदर ठिकाणी धरणाचे बॅक वॉटरमध्ये काही इसम चार यांत्रीक बोटीचे सहाय्याने वाळू उपसा करत असल्याचे दिसले. सदर वाळू उपसा करणारे इसम हे पोलीस पथक आल्याचे पाहून बोटी सोडून पळून गेले. ठिकाणी १२ लाख रुपये किंमतीच्या एकूण चार लोखंडी बोटी मिळून आल्याने सदरच्या बोटी महसूल पथकाने जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून नाश करण्यात आलेल्या आहेत.
COMMENTS