यांत्रिकीकरणाची 15 जुलैला सोडत


वेब टीम : अहमदनगर
नगर तालुक्यात उन्नतशेती समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत यांत्रिकीकरण घटकांसाठी दि. 29 मे ते 29 जून 2019 या कालावधीत ट्रॅक्टर व अवजारे घटकांसाठी शेतकर्‍यांकडून अर्ज मागविले होते.

सदर अर्जाची सोडत काढून जेष्ठताक्रम निश्‍चित करुन निवड यादी तयार करण्यासाठी सदर अर्जाचा लकी ड्रॉ सोमवार दि. 15 जुलै 2019 रोजी सकाळी 10 वाजता भूतकरवाडी, सावेडी तालुका कृषि अधिकारी या कार्यालय आयोजित केला आहे.

सदर लकी ड्रॉ साठी संबधीत अर्जादार शेतकर्‍यांनी कृषि कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post