अधिकाऱ्यांच्या अंगावर ओतल्या चिखलाच्या बादल्या


वेब टीम : कणकवली
शहरातील हायवेवर खड्ड्यांमुळे संतप्त आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी राडा घातला. कार्यकर्त्यांसह त्यांनी हायवे प्रकल्पाचे उप-अभियंता प्रकाश शेडेकर यांचे हात बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांना गुडघाभर पाण्यातून चालण्यास विवश केले. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.

आमदार नितेश राणे यांच्या राड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हायवेचे काम कसे व्यवस्थित होत नाही हे पाहण्यासाठी आता छडी घेऊन थांबणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

कणकवली येथील महामार्गाच्या दुरावस्थेवर संतप्त आमदार नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. कारवाई होत नसल्याचे पाहता त्यांनी गुरुवारी सकाळी थेट कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्याला उचलून आणले. महामार्गावरील खड्डे दाखवताना कथितरीत्या चिखलातून चालवले आणि गडनदी पुलावर नेऊन संतापाच्या भरात खूप काही सुनावले. यानंतर अधिकाऱ्याच्या अंगावर चिखलाने भरलेल्या बादल्या ओतण्यात आल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अधिकारी समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. परंतु, नितेश राणेंचा राग शांत झाला नाही. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या आत कुठल्याही परिस्थितीत सर्व्हिस रोड बनवण्याचा इशारा इशारा दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post