पारनेरमध्ये तुमच्या मनातील उमेदवार - अजित पवार


वेब टीम : अहमदनगर
केंद्रात व राज्यात सत्ता असताना पारनेरचे प्रश्न का नाही सोडविले. त्याकरीता या सरकारमध्ये इच्छा शक्ती नाही. काही लोक स्वार्थासाठी चाले आहेत. कार्यकर्ते मात्र निष्ठेने काम करतात. विधानसभेला नविन चेहरे देणार आहोत. लोकशाही मध्ये सर्वांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे. त्याची चर्चा  करू नका. तुमच्या मनातला उमेदवार देऊ. पारनेरचा आमदार हा आघाडीचा करायचाच आहे, असा निर्धार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवस्वराज्य यात्रेत केला.

निघोज(ता.पारनेर)येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डाॅ.अमोल कोल्हे, विद्या चव्हाण, रूपाली चाकणकर, अंकुश काकडे, फौजिया खान, कपिल पवार, महेबुब शेख, राजेंद्र फाळके दादाभाऊ कळमकर, निलेश लंके, प्रशांत गायकवाड, अशोक घुले, बाबाजी तरटे , गोवर्धन रोहोकले, संदिप रोहोकले आदि उपस्थित होते.

पवार म्हणाले, देशाच्या निवडणूकीचे प्रश्न वेगळे राज्याचे वेगळे आर्थिक स्थितीत देश सातव्या क्रमांकवर गेला आहे. मेघा भरती का नाही केली. आताही नुसत्या घोषणा सुरू आहे. राज्यातील जिल्हा बँक सह इतर ठिकाणी जागा रिक्त आहे. सरकार परवानगी देत नाही. आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास सर्वात प्रथम त्या जागा भरण्यात येतील. एका बाजूला कर्जमाफी मिळावी म्हणून शिवसेना मोर्चे काढतेय आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली म्हणून पारनेरचे शिवसेनेचे आमदार पत्र पाठवतात, असा सवाल तुम्ही विद्यमान लोकप्रतिनिधींना केला पाहिजे. गेल्या पंधरा वर्षात तालुक्यात कोणती मोठी कामे केली याबाबत पारनेरकरांनी त्यांना विचारणा केली पाहिजे.

धनंजय मुंडे म्हणाले, भाजपाच्या जनादेश यात्रेत मुख्यमंत्री त्यांचा खोटारडेपणा उघड करत आहेत. पाहणी अहवाल सांगतो की एक हेक्टर जमीन पाण्याखाली नाही मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे आकडे घेऊन महाराष्ट्रात फिरत आहेत.अमोल कोल्हे - मुख्यमंत्र्यांची यात्रेला काळे झेंडे दाखविले जातात तर शिवस्वराज्य यात्रेला हार आणि फुले स्वागत होत आहे. यांची यात्रा मुख्यमंत्री पदासाठी आहे.शिवस्वराज्य यात्रा ही रयतेसाठी यात्रा आहे.

कोणाच्या जाण्यांनी काही फरक पडत नाही आम्ही पवार यांच्या मागे मावळ्यांनसारखे उभे आहोत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post