भिवंडीत इमारत कोसळली : दोघांचा मृत्यू


वेब टीम : मुंबई
मुंबईतील भिवंडीमध्ये रात्री दोनच्या सुमारास धोकादायक अवस्थेतील चार मजली इमारत कोसळली. या घटनेत दोघांचा मृत्यू पाच जण जखमी झाले.

जखमींवर जवळच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.ही दुर्घटना भिवंडी शांतीनगर पिराणापाडा परिसरात घडली.

या ढिगाऱ्याखाली अजूनही बरेच जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाचे जवान,एनडीआरएफची टीम आणि पोलीस ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत आहेत. सिराज अहमद अन्सारी आणि २२ वर्षीय आखीब ही मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

भिवंडी – निजामपूर महानगर पालिकेचे आयुक्त अशोक रणखांब यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत कोसळण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांना लोकांनी दिल्यानंतर ते लगेच घटनास्थळी पोहचले.

यानंतर लोकांना त्यांनी इमारत रिकामी करण्यास सांगितले. लोक आपले सामान इमारतीतून बाहेर काढताना अचानक इमारत कोसळली. ही इमारत आठ वर्ष जुनी असून अनधिकृत होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post