जगातील पहिले तरंगते डेअरी फार्म


वेब टीम : रोटरडम
नेदरलँडच्या रोटरडममध्ये जगातील पहिले तरंगते डेअरी फार्म सुरू झाले आहे. बंदराजवळ बनवलेल्या या दोन मजली फार्ममध्ये 40 गायी पाळल्या जाऊ शकतात. सध्या तिथे 35 गायी असून त्यांच्यापासून रोज सुमारे 800 लिटर दुधाचे संकलन होत आहे.

गायींचे दूध काढण्यासाठी याठिकाणी रोबो ठेवण्यात आले आहेत. हा डेअरी फार्म डच प्रॉपर्टी कंपनी बेलाडोनने तयार केला आहे. शहरातील दुधाची गरज पूर्ण करण्यासाठी हे फार्म तयार करण्यात आले आहे.

हे फार्म बंदराजवळच असल्याने तेथील उत्पादन ग्राहकांपर्यंत सहजपणे पोहोचवता येते. याठिकाणी असलेल्या गायींचे 80 टक्के खाद्य रोटरडमच्या फूड फॅक्टरींमधून निघालेल्या शिल्लक अन्नपदार्थांपासून बनवलेले आहे.

या खाद्यासाठी स्थानिक रेस्टॉरंटस् व कॅफेंचीही मदत घेतलेली आहे. सोलर पॅनेलच्या सहाय्याने हे फार्म स्वतःच्या वीजपुरवठ्याची सोय करते. फार्ममधील शेणाचा वापर खत आणि गॅस बनवण्यासाठी होतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post