दरोड्याच्या तयारीतील टोळी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद


वेब टीम : अहमदनगर
शहरातील सन्मान लॉज येथे अंधारात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या चार जणांना कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून पकडले विनोद सिद्धेकर चव्हाण (वय २२, रा.गुंडेगाव हराळवस्ती ता.जि.अ.नगर), राहुल उर्फ रमेश बाळू पडवळ (वय २४ रा.निमगाव दावडे ता.खेड जि.पुणे), रामदास बबन कडाळे (वय २९, रा. निमगाव दावडे ता.खेड जि.पुणे) व रामदास उर्फ किरण गोविंद खंडागळे (वय २५, रा.जवळके ता.खेड जि.पुणे) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि विकास वाघ यांना दिनांक 9 चा रात्री एक वाजता जाणाऱ्या प्रवाशांवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सन्मान व जवळ अंधारात चार जण दबा धरून बसले आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानुसार त्यांना पकडण्यासाठी कोतवाली पोलिस गेले असता सदर इसम अंधाराचा फायदा घेत पळून जाऊ लागले त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले परंतु एकजण फरार होण्यास यशस्वी झाला त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक लोखंडी कटावणी लोखंडी गज दोन लाकडी दांडके मिरची पावडर धारदार चाकू लाकडी गुलाल व लहान दगड तीन मोबाईल असे साहित्य मिळून आले. आरोपी विनोद चव्हाण याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून राहुल पडवळ याच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख इशू सिंधू, अप्पर पोलीस प्रमुख सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी  अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि विकास वाघ, पोसई नयन पाटील, पोना नितीन गाडगे, शाहिद शेख, मुकुंद दुधाळ, राजेंद्र थोरात, सुजय हिवाळे, होमगार्ड प्रदीप लोंखडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post