हर्षदा काकडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; राजळे, घुलेंना फटका


वेब टीम : शेवगाव
पक्ष कोणता असेल ते आपण नंतर पाहू, परंतु जर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असाल तर विधानसभा निवडणुकीमध्ये सौ हर्षदा काकडे उभ्या राहतील. निवडणूक लढवायची की नाही हे तुम्ही तालुक्यातील घराघरात जाऊन विचारा. सर्व सामान्य जनतेच्या जीवावरच यापूर्वी आम्ही निवडून आलो आहोत व यापुढेही जनतेच्या जीवावरच निवडणूक करू असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे केले.

जनशक्ती विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज शुभम मंगल कार्यालय शेवगाव येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब राऊत हे होते. याप्रसंगी माजी सभापती डॉ.टी.के. पुरनाळे, जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, उद्योजक बाबासाहेब ढाकणे, अशोकराव दातीर, अशोकराव पातकळ, रमेश भालसिंग, माणिक गर्जे, राजेंद्र गिऱ्हे, सुरेश नाना चौधरी, पंडित नाना नेमाने, कुमार फसले, देविदास गिऱ्हे, वैभव पुरनाळे, चंद्रकांत काकडे, रज्जाकभाई शेख, सुनील काकडे, गुलाब दसपुते, रामेश्वर चेडे, पंडितराव नेमाने, भारत भालेराव, राजू भांगरे, प्रा. सोपानराव पुरनाळे, अशोक आव्हाड इ.प्रमुख उपस्थित होते.


याप्रसंगी अॅड.काकडे बोलताना म्हणाले की, १९५२ पासून काकडे घराने समाजकारणातून राजकारण करत आहे. राजकारण हा आमचा पिंड नाही. माझे वडील कॉ.आबासाहेब काकडे अगदी थोड्या मतांनी विधानसभेत पराभूत झाले होते, पण मी सांगतो एक दिवस परत आमचा असेल. तो दिवस फक्त सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठीच असेल. मागील पाच वर्षात तालुक्यामध्ये विद्यमान आमदारांनी कुठलीच विकासकामे केली नाहीत. “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी परिस्थिती जणू आपली झाली आहे. जवळ पैठण धरण भरले, हक्काचे पाणी ताजनापूर लिफ्ट पूर्ण झाली असती तर वीस गावांना पाणी देता आले असते. तालुक्यातील सर्व प्रश्न आजही जसेच्या तसेच आहेत. आता यामध्ये बदल हवा असेल तर तालुक्यातील माणूस पाहिजे. बाहेरचे येऊन शेवगाव मध्ये लुडबुड करतात मग मी तर शेवगावचाच भूमिपुत्र आहे. मी का थांबू ? आजी माजी आमदार बाहेरूनच आलेली आहे. त्यामुळे सर्वांचे आशीर्वाद जर माझ्या पाठीमागे उभे राहिले तर येत्या निवडणुकीच्या रिंगणात सौ हर्षदा काकडे उभ्या राहतील. पक्ष कोणता ते नंतर पाहू, तुम्ही कामाला लागा. सर्वसामान्यांना भेटा त्यांच्या भूमिका जाणून घ्या. त्यांना आपली भूमिका सांगा. गेलेली पाच वर्ष फेल गेली आहेत. आमदार पाच वर्षात काहीच करू शकलेले नाहीत. आता तर सर्वांना तिकीटाच पडल आहे. दुष्काळाचे काही देणे-घेणे नाही. तेच लोक अदलून बदलून सत्ता उपभोगत आहेत. त्यामुळे आता जनतेने नवीन माणसांना संधी द्यावी. जवळचा माणूस पहावा. “सत्ताधारी कारखानदारांची मक्तेदारी मोडून काढायची हिच वेळ आहे”. आम्ही राजकारणा ऐवजी समाजकारणावर भर देणारी माणसं आहोत असेही अॅड.काकडे बोलताना म्हणाले.

याप्रसंगी जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे, संजय आंधळे, जगन्नाथ गावडे, विष्णू दिवटे, भाऊसाहेब सातपुते, माणिक गर्जे, बाबासाहेब ढाकणे, हरी फाटे आदींची भाषणे झाली. यावेळी “नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जनशक्ती श्रमिक संघाकडून सुरक्षा किट संचाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अशोक गाढे, गणेश दारुणकर, प्रल्हाद गायकवाड, किशोर दहिफळे, भाऊसाहेब मासाळ, भाऊसाहेब बर्डे, बाबासाहेब अडसरे, राधाकिसन शिंदे, शंकरराव काटे, सुरेश म्हस्के, सुभाष वावरे, गोरक्ष वावरे, बाळासाहेब पाटेकर, सुभाष दिवटे, आसाराम शेळके, दादासाहेब आल्हाट, नवनाथ खेडकर, राजेंद्र खेडकर, संजय शिंदे, आदि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय दुधाडे यांनी तर आभार हरिश्चंद्र निजवे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post