बाळासाहेब ठाकरे हेही नारायण राणेंवर नितांत प्रेम करत : गडकरी


वेब टीम : पुणे
शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नारायण राणेंचे नितांत प्रेम आणि श्रद्धा होती. बाळासाहेब ठाकरे यांचेही नारायण राणे यांच्यावर तेवढेच प्रेम होते. शेवटच्या काळात मी त्यांना भेटत असताना हे मला जाणवले, असे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या `झंझावात' या आत्मचरित्राचे काल प्रकाशन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नारायण राणे मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांना काम करण्यास कमी काळ मिळाला. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या भाषणांची जरब सभागृहात असायची. त्यांचे काम नवीन पिढीला शिकण्यासारखे आहे.

पुस्तकाच्या पलिकडील इतिहासाचा मी साक्षीदार आहे. छल, कपट आणि कारस्थान हे त्यांच्या आणि माझ्याही स्वभावात नाही. त्यामुळे आमची मैत्री टिकली. `माझे नेते' म्हणून गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे यांना माझ्या हृदयात स्थान आहे.

कॉंग्रेसमध्ये जाण्याचा नारायण राणे यांचा निर्णय चुकीचा असल्याचे मी त्यांना सांगितले. हे एेकल्यानंतर ते बराच काळ शांत होते; त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते.'' नारायण राणे यांच्यासारखा उत्तम प्रशासन जाणणारा, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व कॉंग्रेसमध्ये गेले नसते तर आजचे चित्र वेगळे असते असेही त्यांनी सांगितले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post