भारतात हिंदू वर्चस्ववादी; अण्वस्त्रे असुरक्षित हातात : इम्रान खान


वेब टीम : इस्लामाबाद
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी अण्वस्र वापराच्या धोरणावर भाष्य केल्यानंतर रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यावर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

भारतातील फॅसिस्ट, वंशवादी तसेच हिंदू वर्चस्ववादी सरकारच्या काळात तेथील अण्वस्रांचा साठा सुरक्षित नाही. याची आंतरराष्ट्रीय समुदायाने नोंद घ्यावी.

भारताच्या अण्वस्रसाठ्याच्या सुरक्षेचा मुद्दा गांभिर्याने विचारात घेण्याची गरज आहे. त्यामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता असून त्याचबरोबर जागतिक शांततेसही धक्का बसू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post