अण्णा धनुष्य उचलू नका, बरगड्या तुटतील : संदीप क्षीरसागरांचा हल्लाबोल


वेब टीम : बीड
अण्णा या वयात धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तर बरगड्या तुटतील अशा शब्दात संदीप क्षीरसागरांनी शिवस्वराज्य यात्रेतून काकांवर हल्लाबोल केला.

ते शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलत होते. बीडच्या सिद्धीविनायक कॉम्प्लेक्समध्ये शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा झाली. या सभेला बीड शहरासह मतदार संघातून मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती होती. संदीप क्षीरसागरांचे नियोजन हे भारदस्त दिसून आले तर शहरातून काढण्यात आलेली मोटारसायकल रॅली ही अभूतपूर्वच होती. तर संदीप क्षीरसागर नावाचा नारा देणारे हजारो तरणे ताठे आणि राष्ट्रवादीचे अबालवृद्ध कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

संदीप क्षीरसागरांनी रात्री आपल्या भाषणाला अधिकच धार दिली आणि ना.जयदत्त क्षीरसागरांवर कडाडून हल्ला चढवला. आमच्या काकांनी ५० कोटी रुपये देवून मंत्रीपद घेतले असा गंभीर आरोपही त्यांनी केला. युवकांची ताकद आपल्या पाठीमागे आहे. त्यामुळे आता आपल्याला कोनीही रोखू शकत नाही. बीड शहरात आम्ही घरोघरी जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेतले. लोकांचा प्रचंड रोष आहे.

 मात्र ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याने लोकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करूनही ते दुसरीकडे जात असल्याने काही मतदारांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे काका प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेत आहेत. उद्या त्यांना चंद्रयान २ कोण्ही पाठवलं हे विचारत तर ते मी पाठवलं म्हणून सांगतील. बीडमधील जनता आतुरतेने विकासाची वाट पाहत आहे.

गेल्या २५ वर्षापासून बीड नपच्या आशीर्वादने नालीतले घाण पाणी घराबाहेर जाण्याऐवजी लोकांच्या घरात शिरत आहे. वाचन नाम्यातील एकही वचन पूर्ण होत नाही. बीड बसस्थानकाचे तीन तीन वेळेस उद्घाटन झालेले आहे, मात्र त्याचे काम अद्यापही सुरू नाही. माझ्या शहरातील पाणी,रस्ते, नाल्यांचे प्रश्नही त्यांनी सोडवलेले नाहीत. थ्रीईडीयट सारखी रेस बीडमध्ये लागलेली आहे.

मागच्या दाराने आमदार झालेले लोक शहरामध्ये फिरत आहेत. बीड पंचायत समितीमध्ये आम्हला बाजूला ठेवण्यासाठी आणि विकास रोखण्यासाठी सगळे विरोधक एकत्र आले तेंव्हा ते ए दोस्ती हम नही तोडेंगे हे गाणे गात होते मात्र आता निवडणूकींच्या तोंडावर हेच मित्र ए सच्च दोस्तभी दुष्मन बन गया हे गाणे गात फिरत आहेत. ही अशी शोकांतीका निर्माण झालेली आहे.

आमच्या काकाने ५० कोटी खर्चून मंत्री पद मिळवले आहे, तेव्हढा निधी बीडच्या विकासासाठी खर्च केला असता तर जनतेने डोक्यावर घेतले असते मात्र बीडमध्ये त्यांचेच दारु, गॅस, रॉकेलचे दुकाने आहेत, बीड मधील अनेक ठिकाणची जमीनही या दोन्ही भावांनी हडपलेली आहे. मी या यासदर्ंभात पॉपर्टीची माहिती अकाऊंटंच्या माध्यमातून विचारली असता माझ्याकडेच दोन कोटींचे कर्ज निघाल्याचे समजले आहे आता तुम्हीच विचार कर, लाठ्या काठ्या खालयला, विरोधाला माझे वडील व मी पुढे अन् मलाई त्यांनी खलली आहे हे जनता विसणार नाही.

तरी ही काका एका कार्यक्रमामध्ये भाषणात बोलताना म्हणाले पोरा-सोरांची ही वानरसेना आहे त्यांच्या काय नादी लागता मात्र गरविष्ठ रावनाची लंका जाळायला आमची वानरसेना तयार असल्याचाही ईशारा त्यांनी दिला.

दरम्यान ते म्हणाले, बीड मतदारांनी अनेकांना आजपर्यंत संधी दिली आहे, एक वेळेसे मला संधी द्या तुमच्या हक्काच्या प्रश्नासाठी मी आणि माझे कुटूंब सदैव तत्पर राहील, अशी भावनीक साध देखील राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप क्षीरसागर यांनी भाषणामधून दिली. तरुणांच्या कपाळावर बेरोजगारीचा शिक्का मारणार्‍या सरकारला सत्तेवरून खाली खेचा-अमोल कोल्हे मुख्यमंत्री साहेब, डोळे उघडून बघा, शिवस्वराज्य यात्रेला कसा प्रतिसाद मिळत आहे.

जनादेश यात्रेत मुख्यमंत्री फडणवीसांना पोलिसांचे कडे असते. शिवस्वराज्य यात्रेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे कडे आहे. रयतेचं राज्य आणण्यासाठी ही यात्रा असून तरुणांमध्ये लाथ मारील तिथे पाणी काढण्याची ताकत असते. सत्ता उलथवण्याची ताकत असे. साडेतीनशे चारशे वर्षांपूर्वी राज्यातला तरुण एकवटला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज आणि त्या तरुणांनी जुल्मी राजवट उलथून टाकली.

तरुणांनो तुम्हाला राज्यातली शिवसेना-भाजपची राजवट उलथवून टाकायची आहे. मुख्यमंत्र्यांना जिथे तिथे काळे झेंडे दाखवले जात आहे तर शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तरुणांच्या कपाळावर बेरोजगारीचा शिक्का मारणार्‍या सरकारला सत्तेवरून खाली खेचा असे आवाहनही अमोल कोल्हे यांनी केले.

ते शिवराज्य यात्रेनिमित्त आयोजित बीडच्या सभेमध्ये बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जयंत पाटील, धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे, रुपाताई चाकणकर, युवा नेते संदिप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम,राजेंद्र जगताप, महेबूब शेख, उषाताई दराडे, उमेश पाटील, भारती शेवाळे, विजय सिंह पंडित, राजेंद्र जगताप, राजन पाटील, रविंद्र क्षीरसागर, ऍड. हेमाताई पिंपळे यांच्यासह आदिंची उपस्थित होते.

हाच तो राज्यातील जनतेमधला असंतोष, असं म्हणत अमोल कोल्हेंनी फडणवीस सरकारला आडेहात घेताना विद्यमान मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर शेतकर्‌यांच्या आत्महत्याप्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल करा, असे म्हणत होते.

आता रोज पाच ते सहा आत्महत्या होत आहेत. मग आता कोणावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा? असा सवाल करत तरुणांच्या कपाळावर बेरोजगारीचा शिक्का मारणार्या सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन अमोल कोल्हेंनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post