आम्ही साठ वर्षात जितके कर्ज घेतले तितके भाजपने पाच वर्षातच घेतले : अजित पवार


वेब टीम : अहमदनगर
लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही जो जनादेश दिला तो मान्य आहे, आम्हीसुद्धा पराभव पत्करला आहे, मात्र आता येणारी निवडणूक ही देशाची नसुन राज्याची आहे. सुराज्य स्थापन करण्यासाठी, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी पुन्हा आघाडीला बहुमत द्या असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

शिवस्वराज्य यात्रा बुधवार (दि.७) नगर शहरात दाखल होता  शहरातून  यात्रा काढण्यात आली. या दरम्यान  जाहीर सभेप्रसंगी ते  बोलत होते.

यावेळी खा. डॉ.अमोल कोल्हे, आमदार विद्या चव्हाण, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, फौजिया खान, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, घनश्याम शेलार, जिल्हा अध्यक्ष मंजुषा गुंड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहराध्यक्ष माणिक विधाते आदी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारने पाच वर्षांमध्ये कोणता विकास केला हे दाखवावे असे आव्हान करून नियोजन शून्य कारभारामुळे सर्वत्र आता दानादान उडालेली पाहायला मिळत आहे. साठ वर्षांमध्ये सत्ता चालवताना जेवढे कर्ज घेतले तेवढेच कर्ज त्यांनी अवघ्या पाच वर्षात घेतले त्यांनीच सरकारला आर्थिक संकटात आणले असे ते म्हणाले.


पवार पुढे म्हणाले की, व्यापारी आज मोठ्या संकटात सापडला आहे. जीएसटीमुळे छोट्या मोठ्या उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. याला जबाबदार हे सरकार आहे असा आरोपही त्यांनी केला. त्यांना सत्ता पाहिजे असती त्या त्या वेळेला हे मोठ्या प्रकारच्या घोषणा करतात कोट्यावधी रुपयांचा निधी देऊ असे म्हणतात, नगर शहरामध्ये महानगरपालिकेची सत्ता स्थापन करताना साडेतीनशे कोटी रुपये देऊ असे म्हणाले एक दमडीही दिली नाही. हीच परिस्थिती कल्याण-डोंबिवलीमध्ये सुद्धा पाहायला मिळाली. पण त्यांना सत्ता मिळवण्यासाठी काही ही आश्वासने देतात.  परंतु ते एक दमडीही देत नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज्यामध्ये महाआघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही दोन ते तीन महिन्यातच कायदा करून ज्या ज्या ठिकाणी उद्योग धंदे आहेत, तेथील शहरातील औद्योगीक क्षेत्रात 75 टक्के लोकांना सामावून बेरोजगारी कमी करु त्यांच्यासाठी कायदा करणार आहोत. तसेच राज्य सरकारमध्ये आत्ता सध्या अनेक पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागात पदे भरली जात नाहीत त्याच्या मागचे गौडबंगाल काय आहे, हे समजू शकत नाही मात्र आमचे सरकार आल्यानंतर राज्यातील जी जी रिक्तपदे आहेत ती तात्काळ भरणारअसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकार आल्यानंतर पाच वर्षांमध्ये 75 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या हे अपयशच म्हणावे लागेल. आज शेतकरी उद्योजक आत्महत्या करायला लागले, हे या राज्याला न परवडणारी आहे. आपल्याला आता राज्य सुजलाम सुफलाम करायचा आहे. त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे असे ते म्हणाले.

निवडणुकीमध्ये मते मागताना आरक्षण देऊ असे म्हणाले धनगरांचे, लिंगायतांचे आरक्षण मात्र देऊ शकले नाही. निवडून आल्यानंतर हे काहीच बघत नाही. पण आम्ही तसे होऊ देणार नाही, मी शब्दाला पक्का आहे, असे सांगून यांची सवय खोटे बोला रेटून  बोला असा हा सरकारचा कारभार आहे असेही पवार म्हणाले.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, रयतेचे राज्य यावे म्हणून आता शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. सध्याच्या सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जान राहीली नाही. राज्यामध्ये जी यात्रा सुरु आहे. या यात्रेला जनता काळे झेंडे दाखवते मात्र, आम्ही काढलेल्या यात्रेचे चौका चौकात स्वागत केले जाते. म्हणजे जनाधार कोणाच्या बाजुने आहे यातुनच लक्षा येते. आज राज्याला संकटात यांनी नेले. जातीपातीत ओढले गेले, पुरोगामी असलेले हे राज्य खाईत लोटण्याचे काम या सरकारने केले आहे अशी घणाघाती टिकाही त्यांनी केली.

जर पाच वर्षात यांनी काम केले असते तर यांना यात्रा काढण्याची गरजच काय होती. सिंंचनाखाली यांनी किती क्षेत्र आणले किती प्रकल्प उभे केले हे सांगावे, वास्तविक पाहतायांनी एक इंचही काम केले नाही मात्र, यांनी रथयात्रा काढण्यापेक्षा श्वेतपत्रिका काढावी म्हणजे सर्व काही उजेडात येईल, असा टोला त्यांनी लावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post